जळगाव : प्रतिनिधी
काहीही एक कारण नसतांना हातात धारदार चॉपर घेवून आलेल्या रणजीत उर्फ टिनू माणिक सुर्यवंशी (रा. वाल्मिक नगर) याने महिलेला अश्लिल शिवीगाळ केली. तसेच तिच्या पतीला जीवंत सोडणार नाही अशी धमकी देखील दिली. ही घटना दि. २१ रोजी सायंकाळच्या सुमारास कांचन नगर परिसरात घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील कांचन नगर परिसरात निता गोपाल सोनवणे (वय ३०) या वास्तव्यास आहे. दि. २१ रोजी सायंकाळी त्यांच्या घरासमोर त्या वाल्मिक नगरात राहणारा रणजीत उर्फ टिनू सुर्यवंशी हा हातात चॉपर घेवून आला. त्याने काहीही कारण नसतांना महिलेसह तिच्या पतीला अश्लिल शिवीगाळ केली. तसेच त्याला चॉपरने मारुन टाकेल अशी धमकी देखील दिली. याप्रकरणी महिलेने लागलीच शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यानुसार संशयित रणजीत उर्फ टिनू माणिक सुर्यवंशी (रा. वाल्मिक नगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास पोहेकॉ योगेश जाधव हे करीत आहे
