Home » जळगाव » पैशांच्या वादातून तरुणाच्या डोक्यात मारला दगड : तिघांवर गुन्हा दाखल !

पैशांच्या वादातून तरुणाच्या डोक्यात मारला दगड : तिघांवर गुन्हा दाखल !

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील शिव कॉलनी परिसरात पैशांच्या वादातून एका तरूणाला डोक्यात दगड मारून गंभीर दुखापत केल्याची घटना शुक्रवारी २२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता घडली आहे. याबाबत शनिवारी २३ ऑगस्ट रोजी पहाटे ३ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  अथर्व महेश मुंदडा वय २१ रा. द्रौपती नगर, जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. शुक्रवारी २२ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास पैशांच्या वादातून झालेल्या भांडणात संशयित आरोपी प्रथमेश तायडे, रा. वाघ नगर, दर्गेश पाथरकर रा. दुध फेडरेशन आणि अभिषेक कुलकर्णी रा. बळीराम पेठ जळगाव या तीन जणांनी अथर्व मुंदडा याला शिवकॉलनी परिसरात शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. आणि दुचाकीवर बसवून नेत शिरसोली रोडवरील जैन व्हॅली येथे मारहाण केली. जखमी झालेल्या अथर्वला जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आला. याप्रकरणी मारहाण करणारे संशयित आरोपी प्रथमेश तायडे, रा. वाघ नगर, दर्गेश पाथरकर रा. दुध फेडरेशन आणि अभिषेक कुलकर्णी रा. बळीराम पेठ जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ प्रशांत पाठक हे करीत आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *