Home » जळगाव » खोटे नगरात तरुणीने घेतला टोकाचा निर्णय !

खोटे नगरात तरुणीने घेतला टोकाचा निर्णय !

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील खोटे नगर परिसरात भाऊ कामावर गेलेला होता तर आई बाहेर गेलेली होती. त्यामुळे घरी एकटीच असलेल्या पल्लवी सुभाष सपकाळे (वय ३२, रा. खोटे नगर) या उच्चशिक्षित तरुणीने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना सोमवार दि. २४ रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील खोटे नगरात पल्लवी सपकाळे ही तरुणी आई व भावासह खोटेनगर परिसरात राहत होती. त्या तरुणीचा भाऊ रेल्वेमध्ये नोकरीला असून तो कामावर तर आई बाहेर गेलेली होती. त्यामुळे घरी एकट्याचा असलेल्या तरुणीने राहत्या घरात गळफास घेतला. काही वेळानंतर तरुणीची आई घरी आली त्या वेळी तिला मुलगी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. त्या वेळी आईला मोठा धक्का बसला.

घटनेची माहिती तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर पोहेकॉ धनराज पाटील व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी तरुणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत पल्लवी ही उच्चशिक्षीत असून ती यापुर्वी नोकरीला देखील होती. परंतु सद्या ती घरीच राहत होती. तिने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णयामुळे तिच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे. तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *