Home » जळगाव » जिल्ह्यातील तरुणाचा अक्कलकुवा गावाजवळ भीषण अपघातात मृत्यू !

जिल्ह्यातील तरुणाचा अक्कलकुवा गावाजवळ भीषण अपघातात मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील मुळजी जेठा महाविद्यालयात पहिल्या वर्षाला शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचा अक्कलकुवा गावाजवळ दुचाकी ट्रकवर धडकल्याने जखमी झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता समोर आली. याबाबत जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शुभराम कैलास बारेला (वय २०) रा. सावखेडा ता. असे मयत झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे कि, यावल तालुक्यातील सावखेडा सीम गावात शुभराम बारेला हा आपल्या आईवडील व भाऊ यांच्या सोबत वास्तव्याला होता. दरम्यान, तो जळगावातील मुळजी जेठा महाविद्यालयात पहिल्या वर्षाला शिकत होते. ७ नोव्हेंबर रोजी शुभराम बारेला हा त्यांच्या गावातील मित्र संदीप बारेला आणि मनिष बारेला यांच्या सोबत दुचाकीने नंदुरबार जिल्ह्यातील देव मोगराई देवीचे दर्शन घेण्यासाठी जात होते. त्यावेळी अक्कलकुवा जवळून जात असतांना पुढे जात असलेल्या ट्रकने अचानक ब्रेक मारल्याने शुभराम बारेला यांची दुचाकी ट्रकवर आदळली. या अपघातात शुभराम हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर प्राथमिक उपचार घेतल्यानंतर त्याला जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना शुक्रवारी २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ७वाजता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *