वाहनधारकांसाठी आजच ‘डेडलाईन’ : एचएसआरपी नंबर प्लेटसाठी उद्या शेवटचा दिवस !

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील वाहनधारकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’ (एचएसआरपी) बसवण्यासाठी आतापर्यंत ८ लाख वाहनांपैकी ३ लाख ५४ हजार ७०१ वाहनधारकांनी प्लेटसाठी ऑनलाइन बुकिंग केली आहे. त्यातील २लाख ९८ हजार ६४१ वाहनधारकांनी नंबर प्लेट बसवली आहे. बुकिंग केलेल्यापैकी ५६ हजार वाहनधारकांनाप्लेट बसवण्याचे काम सुरू आहे. नंबर […]
तेलंगणातून जळगावला निघालेले दाम्पत्य गूढरित्या बेपत्ता : घातपाताचा संशय !

बुलढाणा : वृत्तसंस्था तेलंगणातून जळगावकडे निघालेले एक दाम्पत्य मार्गातच गूढरित्या बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या दाम्पत्याचे शेवटचे लोकेशन बुलढाणा जिल्ह्यातील वडनेर गावाजवळ आढळल्याने त्यांच्या घातपाताचा संशय अधिक गडद झाला आहे. दरम्यान, नांदुरा पोलिसांनी बेपत्ता दाम्पत्याच्या शोधासाठी विशेष पथक तैनात केले आहे. या प्रकरणी रमेश पाटील यांनी नांदुरा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे […]
राम खाडे हल्ला प्रकरणानंतर सरोदे यांचा दावा: ‘आता माझ्यावरही जीवघेणा धोका !

मुंबई : वृत्तसंस्था भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा गंभीर दावा सुप्रसिद्ध विधिज्ञ असीम सरोदे यांनी केला आहे. धस यांच्यावर तब्बल 1000 कोटींच्या जमीन घोटाळ्याचे आरोप असल्याचा दाखला देत सरोदे यांनी हा इशारा दिला. त्यांच्या विधानामुळे बीड जिल्ह्यातील कथित गुन्हेगारी, राजकीय हस्तक्षेप आणि देवस्थानांच्या जमिनींबाबत सुरू असलेल्या वादाला नवे वळण मिळाले आहे. […]
विज्ञाननिष्ठ विचार देशाची प्रगतीचे साधन – डॉ. आयुब पिंजारी

गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे खाऱ्यापाडा गावातील जि. प. शाळेत अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम संपन्न जळगाव : प्रतिनिधी गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे खाऱ्यापाडा गावातील जिल्हा परिषद शाळेत अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन जागृतीसाठी विशेष जनजागृती कार्यक्रम २७ नोव्हेंबरला आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञाननिष्ठ विचार वाढावा, अंधश्रद्धा-अविश्वास दूर व्हावा आणि समाजात विवेकनिष्ठ वातावरण निर्माण व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम […]
“नाशिकच्या झाडांवर घाव, उद्योगपतींचा लाभ? राज्य सरकारवर राज ठाकरेंचा प्रचंड हल्लाबोल!”

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळावा होण्यापूर्वी मोठा वाद सुरु झाला आहे. या सोहळ्यासाठी राज्य सरकारकडून जय्यत तयारी केली जात आहे. मात्र, सरकारने असा एक निर्णय घेतला आहे, ज्यामुळे नाशिककर आणि पर्यावरणप्रेमी रस्त्यावर उतरले आहेत. या कुंभमेळ्यात साधू-महंतांना राहण्यासाठी तपोवन परिसरात 1150 एकरांवर साधूग्राम उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 1800 झाडांची […]
‘फाशी मिळाली तरच समाधान’ : संतोष देशमुख हत्याकांडाच्या प्रथम पुण्यस्मरणी कुटुंबीयांचा हुंकार !

बीड : वृत्तसंस्था संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या संतोष देशमुख हत्याकांडाला आज (२९ नोव्हेंबर) एक वर्ष पूर्ण झाले असले तरी देशमुख कुटुंबीयांचा न्यायासाठीचा संघर्ष अद्यापही सुरूच आहे. “आरोपींना फाशीची शिक्षा झाल्याशिवाय शांतता आणि समाधान मिळणार नाही,” अशी ठाम भूमिका कुटुंबीय व मस्साजोग ग्रामस्थांनी व्यक्त केली. संतोष देशमुख यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त गावात कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. […]
अजिंठा चौकात दुचाकीचा अपघात : दुचाकीस्वार गंभीर जखमी !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील अजिंठा चौक परिसरात दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास डंपरवरील चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत भरधाव वेगात आणत दुचाकीला धडक दिली. या अपघातात मामासह त्यांची चार वर्षीय भाची गंभीररित्या जखमी झाली. मिळालेल्या माहितीनुसार, पवन शांताराम सुर्यवंशी (वय ३३, रा. गजानन पार्क, कुसुंबा) हे त्यांची भाची वैष्णवी वानखेडे (वय ४) हिला दुचाकीवर बसवून कुसुंबा येथुन […]
जिल्ह्यातील तरुणाचा अक्कलकुवा गावाजवळ भीषण अपघातात मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील मुळजी जेठा महाविद्यालयात पहिल्या वर्षाला शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचा अक्कलकुवा गावाजवळ दुचाकी ट्रकवर धडकल्याने जखमी झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता समोर आली. याबाबत जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शुभराम कैलास बारेला […]
शेडनेटच्या आमिषाला शेतकरी बळी; नावावर ७ लाखांचे कर्ज, एजंटसह दोघांवर गुन्हा !

अमळनेर : प्रतिनिधी शेडनेट मंजुरी मिळवून देण्याच्या बहाण्याने शेतकऱ्याच्या नावावर सात लाख रुपये कर्ज काढून त्याची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. २०२० मध्ये घडलेल्या या प्रकरणात तब्बल पाच वर्षांनंतर दोन जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मधुकर गरबड पाटील (रा. नेरपाट, ता. पारोळा) यांच्या अमळनेर तालुक्यातील सडावण येथील शेतासाठी पोखरा योजनेत […]
आज वरिष्ठांकडून तुम्हाला आनंदाची बातमी मिळणार !

आजचे राशिभविष्य दि. २९ नोव्हेंबर २०२५ . मेष राशी नोकरी करणाऱ्यांना त्यांना नेमून दिलेली कामे आजच पूर्ण करावी लागतील, नाहीतर अडचण वाढेल. आज वरिष्ठांकडून तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल. व्यवसाय वाढविण्यासाठी व्यावसायिक नवीन योजना राबवतील. आर्थिक फायदा होईल. वृषभ राशी तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल आणि भविष्यातील समस्या टाळण्यासाठी पैसे कसे वाचवायचे ते शिकाल. आज तुमच्यावर […]