जळगाव : प्रतिनिधी
शहरापासून जवळ असलेल्या तरसोद फाट्याकडून भुसावळकडे जात असलेल्या रस्त्यावर दि. २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पावणेसात वाजता इंडिकेटर न देता अचानक वळण घेत दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकीवरील तिघे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, मुक्ताईनगर तालुक्यातील पिंपरी भोजना येथील आकाश राजेश पाटील (वय २९) हे दि. २४ रोजी सायंकाळी आई वडीलांसह जात होते. यावेळी (एमएच १९, डीझेड ५३४७) क्रमांकाच्या दुचाकीस्वाराने भरधाव वेगाने जात होता. यावेळी त्याने इंडिकेटर न देता तो अचानक वळण घेत त्याने तरुणाच्या (एमएच १९, डीसी ७७३९) क्रमांकाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार तरुणासह त्याचे आईवडील गंभीर जखमी झाले. त्यानंतर धडक देणारा दुचाकीस्वार तेथून पळून गेला. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर आकाश पाटील याने नशिराबाद पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ राजेंद्र ठाकरे हे करीत आहे.



