Home » जळगाव » महामार्ग ओलांडताना अपघात : ७५ वर्षीय वृद्ध ठार !

महामार्ग ओलांडताना अपघात : ७५ वर्षीय वृद्ध ठार !

भुसावळ : प्रतिनिधी

दीपनगर येथील महामार्गावर झालेल्या अपघातात निंभोरा येथील ७५ वर्षीय वासुदेव रूप भिरूड यांचा मृत्यू झाला. वासुदेव भिरूड हे भाजीपाला घेऊन दीपनगर औष्णिक केंद्राकडून निंभोरा येथे जात असताना महामार्ग ओलांडत होते. त्यावेळी एमएच २८ सीए ०८९१ या क्रमांकाच्या दुचाकीने त्यांना धडक दिली. या धडकेत भिरूड गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातात चालक रुपेश चावरिया देखील गंभीर जखमी झाला आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *