Home » जळगाव » प्रौढाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू : चिठ्ठी सापडल्याने खळबळ !

प्रौढाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू : चिठ्ठी सापडल्याने खळबळ !

जळगाव : प्रतिनिधी

धावत्या रेल्वेची धडक लागून खंडेराव नगरच्या रेल्वे पुलावरुन नाल्यात कोसळल्याने मनोज माणिकराव देशमुख (४८, रा. शिव कॉलनी) यांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (२६ ऑगस्ट) उघडकीस आली. मयताच्या खिशात चिठ्ठी सापडली असून, अक्षर स्पष्टपणे समजत नसले तरी त्यामध्ये नाव आणि आत्महत्या करीत असल्याबाबतचा मजकूर लिहिला आहे. पोलिसांनी ती चिठ्ठी जप्त केली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शिवकॉलनी परिसरातील मनोज देशमुख हे मंगळवारी खंडेराव नगरजवळील रेल्वे पुलावरुन जात असताना त्यांना रेल्वेची धडक लागून ते पुलावरुन थेट नाल्यात कोसळले. रामानंद नगर पोलिसांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ शरद वंजारी हे करीत आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *