September 24, 2026 6:08 am

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

मोठी बातमी : मनोज जरांगे पाटलांना मिळाली आंदोलनाची परवानगी !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अंतरवाली सराटीमध्ये पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर जरांगे पाटील यांनी 27 ऑगस्ट रोजी मुंबईकडे कूच केली आहे. मराठा आणि कुणबी एकच आहे, सगेसोयरे अद्यादेशाची अंमलबजावणी करा, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या, या मागणीसाठी मनोज जरांगे हे मराठा समाजाच्या हजारो वाहनांसह हजारोंच्या […]

जिल्ह्यात खळबळ : भाजपच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला

चाळीसगाव : प्रतिनिधी चाळीसगावामध्ये भाजपच्या माजी नगरसेवकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडलीय. प्रभाकर चौधरी असं हल्ला झालेल्या नेत्याचं नाव असून या हल्ल्यामध्ये प्रभाकर चौधरी गंभीर जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी धुळ्यातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पथके तैणात करण्यात आली आहेत. मिळालेल्या […]

उद्धव ठाकरेंनी घेतले ‘शिवतीर्था’वर बाप्पाचे दर्शन !

मुंबई : वृत्तसंस्था तब्बल 20 वर्षानंतर मराठी भाषेच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र राजकीय मंचावर एकत्र आल्याने या भेटीची सर्वत्र चांगलीच चर्चा रंगली होती. यानंतर आता गणेशोत्सवाच्यानिमित्ताने दोघेही बंधु पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या निवासस्थानावरील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे सह कुटुंब दाखल झाले आहेत. उद्धव यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, शिवसेना […]

चार मजली इमारत कोसळली ; आईसह बालिकेचा मृत्यू तर अनेक जण अडकले !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गणेशोत्सवाचा आनंद सुरु असतांना आता मुंबईतील विरार परिसरात एक 4 मजली इमारत कोसळून वाढदिवस असणाऱ्या एका चिमुकलीसह तिच्या आईचा करुण अंत झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत 3 जणांचा बळी गेला आहे. गंभीर म्हणजे ढिगाऱ्याखाली चिमुकलीच्या वडिलांसह अजून 20 ते 25 जण अडकल्याची शक्यता आहे. त्यामुळे मृत्युचा आकडा आणखी वाढण्याची […]

एक लाखांच्या गांजासह तीन अटकेत : यावल पोलिसांची दमदार कारवाई !

यावल : प्रतिनिधी शहराबाहेर चोपडा रस्त्यावर वन विभागाच्या कार्यालयासमोर ४ किलो गांजा नेतांना दोघांना पकडण्यात आले. या दोघांनी वाघझिरा येथून हा गांजा आणल्याची कबुली दिली असून पोलिसांना या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १ लाख ९०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील वाघझिरा येथून गांजाची खरेदी करून दोन जण भुसावळकडे […]

बँड साहित्य चोरीप्रकरणात ७ जणांना पोलिस कोठडी

जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील पहूर येथून जवळच असलेल्या पाळधी गावातील बँड व्यवसायिकाच्या बँडचे साहित्य चोरून नेल्याप्रकरणी पहूर पोलिसांनी ७ संशयितांना अटक करून तब्बल ६ लाख २७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या सर्वांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. बँड साहित्य चोरीस गेल्याचे शुक्रवारी रात्री निदर्शनास येताच बँड व्यावसायिक राहुल सदाशिव माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पहूर […]

पाळधीत पोलिसांना धक्काबुक्की, तीन जणांना अटक !

धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पाळधी येथील पोलिस चौकीत दाखल असलेल्या गुन्ह्यात चौकशीसाठी बोलाविले असता आरोपींनी धक्काबुक्की करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली असून, याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. दोन जण फरार आहेत. बसस्थानक परिसरात तीन दिवसांपूर्वी हाणामारी झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली होती. याची चौकशी करण्यासाठी पाळधी पोलिसांनी […]

भरधाव रिक्षाच्या धडकेत ६ वर्षीय बालिका ठार !

जळगाव : प्रतिनिधी ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात रस्त्याच्या कडेला खेळत असलेल्या मनिषा देवसिंग पावरा ( वय ६ वर्षे, मूळ रा. नागलवाडी, ता. चोपडा, ह.मु. गणेशपुरी, मेहरुण) या बालिकेला रिक्षाने धडक दिल्यामुळे ती ठार झाली. ही दुर्दैवी घटना मंगळवारी (२६ ऑगस्ट) दुपारी गणेशपुरी भागात घडली. या प्रकरणी रिक्षाचालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी […]

प्रौढाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू : चिठ्ठी सापडल्याने खळबळ !

जळगाव : प्रतिनिधी धावत्या रेल्वेची धडक लागून खंडेराव नगरच्या रेल्वे पुलावरुन नाल्यात कोसळल्याने मनोज माणिकराव देशमुख (४८, रा. शिव कॉलनी) यांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (२६ ऑगस्ट) उघडकीस आली. मयताच्या खिशात चिठ्ठी सापडली असून, अक्षर स्पष्टपणे समजत नसले तरी त्यामध्ये नाव आणि आत्महत्या करीत असल्याबाबतचा मजकूर लिहिला आहे. पोलिसांनी ती चिठ्ठी जप्त केली आहे. […]

गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना किती वाजेपर्यत होणार : जाणून घ्या मुहूर्त !

मुंबई : वृत्तसंस्था आज सर्वत्र बाप्पांच्या आगमनाचा जल्लोष होत आहे. बुधवारी ब्राह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे ४:५० ते दुपारी १:५३ पर्यंत गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करावी. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना मध्यान्हानंतर देखील करता येऊ शकते. विशेष म्हणजे यंदाचा गणेशोत्सव हा दहा नव्हे, तर अकरा दिवसांचा असणार आहे, अशी माहिती दाते पंचागकर्ते मोहन दाते यांनी दिली. ज्या गणेशाचे आवाहन […]

error: Content is protected !!