Home » महाराष्ट्र » अंबानी, शर्मा यांनी नाटक करायचे नाही. आम्ही मुंबईचे मालक आहोत ; जरांगे पाटील आक्रमक !

अंबानी, शर्मा यांनी नाटक करायचे नाही. आम्ही मुंबईचे मालक आहोत ; जरांगे पाटील आक्रमक !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील मराठा आरक्षण संदर्भात सरकारने काम सुरू केले आहे. आमचे काम सुरू केले तर सरकारला आम्ही मोठेपण देऊ. तुम्ही जर आमचे कामे केले तर आम्ही सरकारचे कौतुकच करु, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, अंबानीच्या सुनेने मराठा बांधवांना त्रास दिला हे जर खरं असेल तर मग आम्ही अंबानी काय ते पाहणार नाही. माझ्या मराठ्याला त्रास दिला तर मोकळंच करील. अंबानी यांची सून काही तरी मराठा बांधवांना म्हणाली हे जर खरं असले ना तर मग आम्ही पाहणार नाही. मराठ्याच्या नादी लागायचे नाही. तुम्ही पाहूणे आहात मुंबईचे मालक आम्ही आहोत, असे म्हणत त्यांनी सुमोना चक्रवर्ती वर निशाणा साधला आहे.तर मुंबईचे बेटच मोकळं करील. तिला काय त्रास झाला. मुंबईत सुरक्षित वाटत नसेल तर समुद्रात घर बांधा. अंबानी, शर्मा यांनी नाटक करायचे नाही. आम्ही मुंबईचे मालक आहोत, तुम्ही पाहूणे आहात. मराठ्याला टार्गेट करु नका, नाही तर मी सोडणार नाही.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, देवाभाऊ आशयाचे कुणी बॅनर लावा, कुणी कॅम्पियन करा, आम्ही तुमचे आभार आणि कौतुक करू. मात्र तातडीने प्रमाणपत्र द्या. तुम्ही कामे केल्यास आम्ही तुम्हाला मोठेपणा देऊ. शिंदे समितीस बढती दिल्यास सर्व विभागात नोंदी शोधण्याचे काम सुरूच ठेवा. सरकारने कामे केल्यास आम्ही कौतुकच करू. धनंजय मुंडेंवर बोलणं म्हणजे वर्ष वाया घालवणं, त्यांनी मजा करा, राजकारण करा, पण मराठ्यांच्या वाट्याला गेल्यास मात्र सुट्टी नाही, असा इशारा देत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी टीका केली आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, एकनाथ शिंदे हे मोकळ्या स्वभावाचा माणूस आहे. ते काम करणारे नेतृत्व आहे. जी आर एकदम ओके आहे. बुळबुळ करणाऱ्याला करु द्यात. मी देतो आहे गरिबांच्या पोरांना मग टेन्शन घ्यायचे नाही. कुणी येऊन काहीही सांगेल आपण ऐकायचे नाही, सरकारने आपल्याला शब्द दिला आहे की जर काही समस्या आली तर नवीन सुधारित जी आर काढणार आहे, असे म्हणत जी आर वर प्रश्न चिन्ह उपस्थित करणाऱ्यावर मनोज जरांगे पाटील यांनी निशाणा साधला आहे.गरीब मराठ्यांनी कुणाचेच ऐकायचे नाही.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, गरीब मराठा बांधवांनी गरीब मराठ्यावर विश्वास ठेवा. काहीही बरळणाऱ्या लोकांनीच मराठा समाजाचे नुकसान केले आहे. मराठवाड्यातील एकही समाज बांधव आरक्षणापासून वंचित राहणार नाही. पश्चिम महाराष्ट्रातील कुणालाही आरक्षणापासून वंचित राहू देणार नाही. मालोजीराजेंना आरक्षण घ्यायचे असेल तर ते घेतील नाही तर नाही घेणार कुणावर जबरदस्ती नाही.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सरकारने काढलेल्या जी आर मध्ये बदल करण्यासारखे काहीच नाही. काम प्रत्यक्षात सुरू केले की काय समस्या येतातच. त्यामुळे काम सुरू करावे त्यानंतर जी आरमध्ये थोडा फार बदल करावाच लागतो. गेल्यावर्षी नारायण गडावर दसरा मेळावा घेतला. यावेळी कसे होईल सांगता येत नाही. कारण वेळ कमी राहिला आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याचे अवघड आहे. जसे असेल तसे जितके मराठा बांधव असोत त्यांच्या उपस्थितीत छोटेखानी दसरा मेळावा घेऊ.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *