Home » जळगाव » १८ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

१८ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

जळगाव : प्रतिनिधी

नाईट शिफ्ट असल्याने वडील चटई कंपनीत ड्युटीवर निघून गेले. मात्र घरी एकटाच असलेल्या अनिकेत विजय मौर्य (वय-१८, रा. उत्तर प्रदेश ह.मु. सुप्रीम कॉलनी) या परप्रांतीय मुलाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मुलाचा मृतदेह बघताच वडीलांनी एकच आक्रोश केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

उत्तरप्रदेशातील विजय मौर्य हे मुलगा अनिकेत सोबत रोजगारासाठी जळगावात आले होते. एमआयडीसीतील एका चटई कंपनीत दोघ बापलेक काम करुन आपला उदनिर्वाह करीत होते. त्यांनी सुप्रीम कॉलनीत एक खोली भाड्याने घेतलेली होती. शुक्रवारी दोघांची रात्रपाळी ड्युटी होती. त्याचे वडील हे रात्री कंपनीत ड्युटीवर निघून गेले तर अनिकेत हा घरी एकटाच होता. मध्यरात्रीच्या सुमारास त्याचे राहत्या खोलीमध्ये गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली.

शनिवारी सकाळी अनिकेतची वडील हे कामावरुन घरी आले. यावेळी त्यांनी आपल्या खोलीचा दरवाजा ठोठावला, मात्र आवाज देवूनही आतून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी शेजारच्यांच्या मदतीने खोलीचा दरवाजा तोडला. यावेळी त्यांना अनिकेत हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला, मुलाचा मृतदेह दिसताच विजय मौर्य यांनी हंबरडा फोडीत आक्रोश केला.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *