भुसावळ : प्रतिनिधी
शहराजवळील तापी नदीच्या पुलावरून अक्षय नीलेश चौधरी (१८) या तरुणाने नदीत उडी घेतल्याची घटना बुधवारी सकाळी दहा वाजेच्या वाजेच्या दरम्यान घडली. या तरुणाचा शोध नदी पात्रात घेतला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नदीत उडी घेण्याच्या आधी अक्षयने आपल्या एका मित्राला मोबाइलवर व्हिडिओ कॉल केला व गुडबाय केले. अन्य एकानेही तो तापी नदीच्या पुलावरून नदीत उडी घेण्याच्या तयारीत असल्याचे पाहताच त्यास पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो नदीत झेपावला. घटनेनंतर पुलावर अक्षय चौधरी याचा मोबाइल व चपला आढळल्या. दरम्यान अक्षयने हे पाऊल का उचलले हे कळू शकले नाही. नदीत पथकांकडून त्याचा शोध सुरू आहे



