Home » जळगाव » विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने प्रौढाचा दुर्देवी मृत्यू !

विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने प्रौढाचा दुर्देवी मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी

रस्त्यावर बॅनर लावतांना अचानक विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने अनिल पापा गवळी (वय ५२, रा. कांचननगर) यांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास कुसुंबा गावाजवळ घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील कांचननगर परिसरात अनिल गवळी हे पत्नी व दोन मुलांसह वास्तव्यास होते. ते जाहीरातींचे बॅनर लावण्याचे काम करुन आपल्या कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. बुधवारी सकाळच्या सुमारास कुसुंबा रस्त्यावर  बॅनर लावण्यासाठी गेले होते. याठिकाणी लोखंडी फ्रेमवर बॅनर लावत होते. अचानक त्याठिकाणाहून गेलेल्या विद्युत तारांचा त्यांना स्पर्श होवून जोदार विजेचा झटका बसला. त्यामुळे अनिल गवळी हे उंचावरून खाली कोसळले आणि त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. बॅनर लावतांना गवळी हे उंचावरुन खाली कोसळल्याचे लक्षात येताच आसपासच्या नागरिकांनी तातडीने त्यांना जिल्हा रूग्णालयात हलविले. तेथे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती मृत घोषित केले. सायंकाळी जिल्हा रूग्णालयात नातेवाईकांची एकच गर्दी झाली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *