शरद पवारांच्या पक्षात लवकरच राजकीय भूकंप : शिंदेंच्या नेत्याचा दावा !

मुंबई ; वृत्तसंस्था गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला होता त्यानंतर राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाली होती, आता पुन्हा एकदा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात लवकरच मोठा भूकंप होणार असल्याचा दावा शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. या संदर्भात मी आधी देखील भाष्य केले होते, असा दावा त्यांनी केला आहे. जयंत पाटील […]
मुंबईत ‘मराठी’चा मुद्दा पुन्हा मनसेच्या दरबारात : पदाधिकारी पोहचले थेट एलआयसी ऑफिसमध्ये !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा मोठ्या चर्चेत येत असतांना आता पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा मराठीच्या मुद्द्यावरून आज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मुंबईतील कांदिवली येथील एलआयसी ऑफिसमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी धडक दिली. एलआयसीच्या अर्जावर मराठी भाषेचा पर्याय नसल्यामुळे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी एलआयसीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तसेच अर्जावर फक्त गुजराती आणि […]
मोठी बातमी : ठाकरे बंधू येणार एकत्र ? निमंत्रण पत्रिका व्हायरल !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना व राज ठाकरेंच्या मनसेला मोठा धक्का बसला होता यावर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे यासाठी मुंबईतील मराठी सेना अॅक्शन मोडमध्ये आली आहे. येत्या ३० मार्च रोजी ठाकरे बंधू मिलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यापूर्वी मराठी सेना पक्षाने दादर सेना भवन […]
माझे काही खरे नाही, माझ्यावर विश्वास ठेवू नका : शरद पवारांच्या नेत्याचे मोठे वक्तव्य !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून अजित पवार गटाचे काही नेते शरद पवार गटातील जयंत पाटील लवकरच अजित पवार गटात येणार असल्याच्या बातम्या आल्यानंतर आता जयंत पाटील यांच्या वक्तव्याने राज्यात राजकीय खळबळ उडाली आहे. नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचा आझाद मैदानावर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला शरद […]
बापरे : आईने दोन्ही मुलांना घेवून घेतली विहिरीत उडी !

सोलापूर : वृत्तसंस्था जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. दोन मुले गतिमंदच असल्याच्या चिंतेतून आईने त्या दोन्ही मुलांसह गावाजवळील ८० फूट खोल विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेने सोलापूर जिल्हा हादरला आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील वांगी येथे बुधवारी 12 मार्च रोजी ही घटना घडली .चित्रा कविराज हाके (वय, २८), पृथ्वीराज हाके (वय, ७), […]
मध्यप्रदेशात भीषण अपघात : सात जणांचा जागीच मृत्यू तर तीन गंभीर !

उज्जैन : वृत्तसंस्था देशातील अनेक महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असतांना आता एक भीषण अपघाताची घटना मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातून समोर आली आहे. भीषण रस्ते अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. तर या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाल्याचे म्हटले जात आहे. बदनावर-उज्जैन रस्त्यावरील बामनसुता गावाजवळ रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हा अपघात […]
बंजारा प्रीमियर लीग: सेवालाल प्रतिष्ठानचा तिसऱ्यांदा विजय

जळगाव : प्रतिनिधी बंजारा स्पोर्ट फाउंडेशनतर्फे आयोजित बंजारा प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत सेवालाल प्रतिष्ठान संघाने तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले आहे. समाजातील युवकांना एकत्र आणण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित ही तीन दिवसीय स्पर्धा सागर पार्क मैदानावर पार पडली. ही स्पर्धा केवळ खेळापुरती मर्यादित नसून, समाजातील एकात्मता आणि प्रेरणा वाढवण्याचा एक सुंदर प्रयत्न ठरली आहे असे मत […]
विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने प्रौढाचा दुर्देवी मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी रस्त्यावर बॅनर लावतांना अचानक विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने अनिल पापा गवळी (वय ५२, रा. कांचननगर) यांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास कुसुंबा गावाजवळ घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील कांचननगर परिसरात अनिल गवळी हे पत्नी व दोन […]
‘त्या’ डंपर चालकाने मध्यरात्री तीन मजुरांना चिरडले

जळगाव : प्रतिनिधी जळगाव खुर्द गावाजवळील महामार्गालगत असलेल्या सव्हींस रस्त्याच्या बांधकामाच्या ठिकाणी अज्ञात डंपरने झोपलेल्या तीन मजुरांना चिरडल्याची घटना मंगळवारी घडली होती. पोलिसांकडून दिवसभर चिरडणाऱ्या वाहन चालकाचा शोध घेतला जात होता. अखेर नशिराबाद पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरुन मुरुम वाहतुक करणाऱ्या प्रकाशकुमार सुदामाप्रसाद पटेल (वय २४, रा. उफरवली, पो. कदौर, तहसील सिहाबाद, जि. सिंधी, मध्यप्रदेश) याच्या […]
राजकारणात पद आणि प्रतिष्ठा वाढणार !

आजचे राशिभविष्य दि.१३ मार्च २०२५ मेष राशी बेरोजगारांना रोजगार मिळेल. मालमत्तेचे वाद मिटतील. राजकारणात पद आणि प्रतिष्ठा वाढेल. प्रवास करताना कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून कोणतेही अन्न किंवा पेय घेऊ नका. अन्यथा फसवणूक होऊ शकते. सरकारी मदतीमुळे उद्योगधंद्यात लाभदायक परिस्थिती निर्माण होईल. वृषभ राशी आज व्यवसायात उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होईल. जुन्या व्यवहाराबाबत वाद वाढू शकतात. आर्थिक अडचणींमुळे […]