Home » जळगाव » भरधाव पिकअपच्या धडकेत प्रौढाचा दुर्देवी मृत्यू !

भरधाव पिकअपच्या धडकेत प्रौढाचा दुर्देवी मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी

भरधाव वेगाने आलेल्या पिकअप वाहनाने जोरदार धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या जामनेर तालुक्यातील गाडेगाव येथील ५३ वर्षीय प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना बुधवार, १९ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, मनोज त्र्यंबक शिरसाळे (वय ५३, रा. गाडेगाव, ता. जामनेर) असे मयत प्रौढाचे नाव आहे. ते पत्नी आणि तीन मुलांसह गाडेगाव येथे राहत होते. बुधवारी दुपारी ते एका खासगी कामासाठी नेरी येथे गेले होते. रात्री ८ वाजता काम आटोपून ते घरी जाण्यासाठी नेरी महामार्गावर उभे असताना, जळगावकडे जाणाऱ्या (एमएच १९ सीएक्स १०६८) या मालवाहू पिकअप वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *