Home » जळगाव » अकरावीच्या युवक घरातून गेला अन दुसऱ्या दिवशी आढळला मृतदेह !

अकरावीच्या युवक घरातून गेला अन दुसऱ्या दिवशी आढळला मृतदेह !

जळगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील धानवड येथील आकाश दिलीप पाटील (वय १७) हा तरुण रात्री घरातून निघून जात झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवारी दुपारी धानवडनजीकच्या जंगलात उघडकीस आली. मुलाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील धानवड येथे आकाश पाटील हा मुलगा वास्तव्यास होता. नुकताच दहावी पास होवून त्याने अकरावीमध्ये प्रवेश घेतला होता. शुक्रवारी रात्री तो घरून बाहेर निघून गेला आणि रात्रभर घरीच परतला नाही. त्यामुळे त्याच्या कुटुंबियांकडून त्याचा शोध घेतला जात होता.

दुसऱ्या दिवशी शनिवारी दुपारी गुरे चारणाऱ्या काही जणांना आकाशने एका झाडाला गळफास घेतल्याचे दिसले. त्याने घटनेची माहिती ग्रामस्थांनी दिली. त्यानुसार आकाशच्या नातेवाईक व ग्रामस्थांनी जंगलात धाव घेत आकाशला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. आकाशच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *