September 21, 2026 9:45 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

‘मी उच्चपदस्थ अधिकारी, तुझी लायकी नाही…’ अधिकाऱ्याच्या पत्नीने घेतला टोकाचा निर्णय !

मुंबई : वृत्तसंस्था कांदिवली पूर्व येथील आकुर्ली परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) उपनिबंधक बापू कटरे यांच्या 44 वर्षीय पत्नी रेणू कटरे यांनी शनिवारी (26 जुलै) रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. रेणू या पेशाने शिक्षिका होत्या. त्यांच्या आत्महत्येमागे सासरकडून हुंड्यासाठी सतत होणारा शारीरिक आणि मानसिक छळ कारणीभूत […]

“लाडकी बहिण योजना आणि पीक विम्यावरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल

जळगाव : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘लाडकी बहिण’ आणि ‘एक रुपयात पीक विमा’ या योजनांच्या अंमलबजावणीवरून त्यांनी सरकारवर विश्वासघाताचा आरोप केला आहे. त्यांनी सरकारवर लाडक्या बहिणींना आणि शेतकऱ्यांना दिशाभूल केल्याचा ठपका ठेवला आहे. एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून रोहित पवार यांनी आपली […]

‘ऑपरेशन महादेव’ अंतर्गत लष्कराने तीन दहशतवाद्यांना केले ठार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय सैन्याने पुन्हा एकदा दहशतवाद्यांचा कट उधळून लावला. जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगरमध्ये आज लष्कराने तीन दहशतवाद्यांना ठार मारल्याचे सांगण्यात येत आहे. दहशतवाद्यांवरील कारवाईसाठी ‘ऑपरेशन महादेव’ असे मोहिमेला नाव देण्यात आले. लष्कराच्या ‘चिनार कॉर्प्स’नेही सोशल मीडियाद्वारे ही माहिती शेअर केली. पहलगाममधील हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने आतापर्यंत अनेक दहशतवाद्यांना ठार मारले आहे. गेल्या काही […]

“सोने-चांदी स्वस्त झालं! बाजारात उसळी की चिंता?”

ग्राहकांना दिलासा : सोन्यासह चांदीचे दर झाले कमी ! गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किमतीत सतत घसरण होत आहे. २८ जुलै २०२५ रोजी सोन्याच्या किमतीत सुमारे ५०० रुपयांची घट झाली आहे. आज २४ कॅरेट सोने ९९,९२० रुपये प्रति १० ग्रॅम दराने विकले जात आहे, तर शनिवारी त्याची किंमत १,००,४७० रुपये होती. आज चांदीची किंमतही […]

“ओऽऽऽ १२मतीच्या मोठ्ठया ताई…”; चित्रा वाघांचा रोहिणी खडसेंवर हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील पुण्यातील रेव्ह पार्टीत एकनाथ खडसे यांचा जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आल्यानंतर राजकाणात मोठी खळबळ उडाली आहे. एकीकडे हनी ट्रॅपच्या आरोपावर खडसे, महाजनांमध्ये वाद सुरु असतानाच हे प्रकरण समोर आले आहे. या रेव्ह पार्टी  प्रकरणाची माहिती देत पोलिसांकडून एक प्रेसनोट देखील जारी करण्यात आली आहे. याचा फोटो शेअर करत भाजपच्या […]

मी उत्तर द्यायलाच बांधील नाही ; अजित पवारांचा हल्लाबोल !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उपटसूंभ्या असा उल्लेख केला आहे. रोहित पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, कोणीही उपटसूंभ उठेल आणि काहीही विचारेल, त्याला उत्तर द्यायलाच मी बांधील आहे, अे नाही. यासोबतच माणिकराव ठाकरेंच्या मंत्रिपदाबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, त्यांचा […]

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत दोघांनी केले गैरवर्तन !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील हरिविठ्ठलनगर परिसरात दि. १८ ते दि. २५ जुलैदरम्यान अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिच्याशी गैरवर्तन करीत विनयभंग केला. या प्रकरणी योगेश विनोद कोळी (वय २१), अनिल यशवंत माळी (वय २१) याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आले. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका […]

अकरावीच्या युवक घरातून गेला अन दुसऱ्या दिवशी आढळला मृतदेह !

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील धानवड येथील आकाश दिलीप पाटील (वय १७) हा तरुण रात्री घरातून निघून जात झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवारी दुपारी धानवडनजीकच्या जंगलात उघडकीस आली. मुलाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील धानवड येथे आकाश पाटील हा मुलगा वास्तव्यास होता. नुकताच […]

जुन्या वादातून दोघे एकमेकांवर भिडले ; एकाचा खून तर एक जखमी !

जळगाव : प्रतिनिधी जुन्या वादातून धारदार शस्त्र घेऊन दोन जण एकमेकांवर भिडले व यात धीरज दत्ता हिवराळे (२७, रा. सम्राट कॉलनी) या तरुणाचा मृत्यू झाला. तर कल्पेश वसंत चौधरी (२५, रा. सम्राट कॉलनी) हा गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना रविवारी दुपारी साडेतीन वाजता जोशी कॉलनीत घडली. घटनेनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय […]

या राशीतील लोकांनी आज आरोग्याकडे दुलर्क्ष करू नका !

मेष राशी मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक असणार आहे. तुमची आर्थिक वाढ होईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला यश मिळेल. प्रेमसंबंध सुधारतील. इतकेच नाही तर तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत सुट्टीत बाहेर जाण्याचा प्लॅन करु शकता. आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. प्रॉपर्टीशी संबंधित काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. वृषभ राशी वृषभ राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये यश मिळेल. […]

error: Content is protected !!