जळगाव : प्रतिनिधी
राहत्या घरामध्ये गळफास घेऊन रमेश हरी सहाने (७०, रा. अयोध्यानगर) यांनी आत्महत्या केली. ही घटना २६ नोव्हेंबर रोजी अयोध्यानगरात घडली होती. या प्रकरणी ६ डिसेंबर रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे जामनेर येथील रहिवासी असलेले रमेश सहाने यांचे जामनेर येथे दुकान आहे. ते अधूनमधून जळगावातील अयोध्यानगरातील घरी येऊन राहायचे. ते २६ नोव्हेंबर रोजी येथे आलेले असताना त्यांनी राहत्या घरातच गळफास घेतला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले.



