पारोळा : प्रतिनिधी
मुलीला पळवून घेवून गेल्याच्या रागातून संतप्त झालेल्या नातेवाईकांनी मुलाच्या घराला आग लावून जाळपोळ केली. ही घटना तालुक्यातील कन्हेरे गावात घडली. घरातील संपुर्ण साहित्य जळून खाक झाले असून याप्रकरणी पारोळा पोलीसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील कन्हेरे येथील भिकन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन त्यांचा मुलगा अमोल पाटील हा दि. १६ रोजी गावातील एका मुलीला पळवून घेवून गेला. दोघ देखील घरी न परतल्यामुळे मुलीच नातेवाईकांनी आमच्या मुलीला परत आणून द्या नाहीतर तुम्हाला जीवेठार मारु अशी धमकी दिली. तसेच त्यांची मुलगी घरी न आल्यामुळे त्याचा राग मनात ठेवत संशयित कल्पेश पांडुरंग राजपूत, ज्ञानेश्वर भागवत राजपूत, अक्षय शंकर पाटील (रा. कन्हेरे, ता. पारोळा) यांनी दि.१७रोजी रात्री आठ वाजता पाटील यांच्या घरात शिरुन त्यांच्या घराला आग लावली.
या आगीत घराचा मुख्य दरवाजा संसार उपयोगी वस्तू तसेच अंगणात लावलेली मोटरसायकल, शेतीचे व परिवारातील सर्वांचे कागदपत्रे जळून खाक झाली. यामध्ये सुमारे लाखाचे नुकसान झाले आह. त्यामुळे मुलीच्या नातेवाईकांविरुद्ध पारोळा पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश महाजन करीत आहे.



