बोदवड : प्रतिनिधी
तालुक्यातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एक विवाहिता मुलासह तर एक पुरुष हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील एका गावात एक वृद्ध महिला व तिचा अंथरुणास खिळलेला मुलगा तसेच सून आहे. पाच वर्षापूर्वी वृद्धेचा मुलगा हा गंभीर आजारामुळे अंथरुणावर पडून आहे. ८ रोजी या आजारी व्यक्तीची पत्नी ही तिच्या मुलासह अचानक बेपत्ता झाल्याचे समोर आले.
७ रोजी विवाहिता आणि तिचा मुलगा हे खोलीत झोपले होते. त्यानंतर ८ रोजी दोघेही बेपत्ता असल्याचे वृद्धेच्या लक्षात आले. त्यांनी नातेवाईकांकडे शोधाशोध केली. अखेर सून आणि नातू हरवल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दिली आहे. दुसऱ्या घटनेत जुनोना येथील सुभाष संतोष पाटील (वय ४५) हा इसम स्वतःची गाडी चालवतो. ६ रोजी कामानिमित्त घराबाहेर पडला. तो अद्यापपावेतो परतला नाही. त्याचा मोबाईलही बंद आहे. त्याचे भाऊ नामदेव संतोष पाटील यांनी बोदवड पोलिसात हरवल्याची तक्रार दिली आहे.



