धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीच्या छेडखानीवरून झालेल्या वादातील चाकू हल्ल्यात तीन जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीच्या छेडखानीप्रकरणी संशयित आरोपीविरोधात पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात संशयिताला जामीन मिळाल्यानंतर तो घरी आला. त्यानंतर पुन्हा त्याने वाद घातला. यानंतर पीडितेची आई व इतर नातेवाईक त्याला समजावण्यासाठी गेले असता तेथे पुन्हा त्यांच्यात वाद झाला. हा वाद वाढत गेला. या वेळी संशयित रोहित शाम पाटील याने चाकू काढून केलेल्या हल्ल्यात तीन जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी रोहित पाटील याच्याविरोधात पाळधी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास स.पो.नि. प्रशांत कंडारे व सहकारी करत आहेत.
