November 6, 2026 10:31 pm

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » महाराष्ट्र » भाकरी फिरणार का? शरद पवार–सुनेत्रा पवार भेटीकडे महाराष्ट्राचे लक्ष

भाकरी फिरणार का? शरद पवार–सुनेत्रा पवार भेटीकडे महाराष्ट्राचे लक्ष

पुणे : वृत्तसंस्था

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेण्यासाठी रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. बारामती येथील सहयोग सोसायटीत जाऊन शरद पवार सुनेत्रा पवारांची भेट घेणार असून, उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ही दोघांची पहिलीच भेट ठरणार आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच या भेटीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होण्यापूर्वीही सहयोग सोसायटी राजकीय घडामोडींचे केंद्रबिंदू ठरली होती. अजित पवारांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल घडले. त्या काळात सहयोग सोसायटी, गोविंदबाग आणि मुंबईतील देवगिरी बंगला येथे वेगवान घडामोडी घडत असल्याचे पाहायला मिळाले होते.

अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार बारामतीत पुन्हा सक्रिय झाल्याचे चित्र दिसून आले. अस्थीविसर्जनाच्या दिवशी त्यांनी नीरा नदीच्या पाहणीसाठी भेट देत स्थानिक कार्यकर्त्यांकडून दूषित पाण्याबाबत माहिती घेतली होती. शरद पवार आणि त्यांच्या गटातील अनेक नेत्यांची दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची इच्छा असल्याचे सातत्याने बोलले जात आहे. मात्र, दुसरीकडे अजित पवार गटातील नेत्यांनी आम्ही एनडीएसोबतच राहणार असल्याचा ठाम निर्धार व्यक्त केला आहे. दरम्यान, छगन भुजबळ यांनी दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत भाजपला विचारावे लागेल, असे विधान केले होते. यावर शरद पवारांनी आक्षेप घेत, “राष्ट्रवादीबाबतच्या प्रश्नात मुख्यमंत्र्यांची भूमिका काय?” असा सवाल उपस्थित केला होता. त्यामुळे राजकीय वातावरण अधिक तापले होते.

आता शरद पवार थेट सहयोग सोसायटीत जाऊन सुनेत्रा पवारांची भेट घेणार असल्याने, या भेटीत नेमकी काय चर्चा होते, विलीनीकरणाबाबत काही ठोस संकेत मिळतात का, की ही केवळ कौटुंबिक भेट ठरते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, ही भेट कौटुंबिक असल्याचेही बोलले जात आहे. अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री बनवण्याच्या घडामोडींमुळे पवार कुटुंबाची प्रत्यक्ष भेट होऊ शकली नव्हती. त्यामुळे आज पवार कुटुंबातील सदस्य सहयोग सोसायटी येथील निवासस्थानी एकत्र जमल्याची माहिती आहे. मात्र, राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेता या भेटीचे अर्थ अनेक पातळ्यांवर काढले जात आहेत.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!