बोदवड : प्रतिनिधी
तालुक्यातील प्रसिद्ध उजनी दर्यावर नवस फेडण्यासाठी आलेल्या महिलेसह तेरा जणांवर कुऱ्हाड, लोखंडी पाईप आणि इतर हत्यारांनी हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना रविवारी (५ ऑक्टोबर) घडली. याप्रकरणी संबंधितांवर बोदवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ येथील लकीबा नगर (पंधरा बंगला परिसर) येथील मीना नागराज स्वामी (वय ५४) या आपल्या नातवाच्या कार्यक्रम नवसाचा करण्यासाठी नातलगांसह उजनी दर्यावर आल्या होत्या. संध्याकाळी पाचच्या सुमारास दर्शनासाठी जात असताना चिंचेच्या झाडाजवळ धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून वाद झाला. यामध्ये २२ वर्षाच्या एका तरुणाने संतापून काही साथीदारांना बोलावून घेतले आणि अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात कुऱ्हाड, लोखंडी पाईप, विजारसारख्या हत्यारांचा वापर करून १३ जणांना गंभीर दुखापत करण्यात आली.
मीना नागराज स्वामी, कुणाल नागराज, लोकेश, संतोष गोविंद इदा, दिनेश छोटेलाल गुप्ता, सीता गुप्ता, सारिका संतोष इदा, स्वप्नील सोनवणे, शरद पोळ, संजय इदा, रवी आमदे, मीना नागराज इदा व अन्य एक नातलग. सर्व जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असून, काहींची प्रकृती चिंताजनक आहे.



