Home » जळगाव » बंजारा प्रीमियर लीग: सेवालाल प्रतिष्ठानचा तिसऱ्यांदा विजय

बंजारा प्रीमियर लीग: सेवालाल प्रतिष्ठानचा तिसऱ्यांदा विजय

जळगाव : प्रतिनिधी

बंजारा स्पोर्ट फाउंडेशनतर्फे आयोजित बंजारा प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत सेवालाल प्रतिष्ठान संघाने तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले आहे. समाजातील युवकांना एकत्र आणण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित ही तीन दिवसीय स्पर्धा सागर पार्क मैदानावर पार पडली. ही स्पर्धा केवळ खेळापुरती मर्यादित नसून, समाजातील एकात्मता आणि प्रेरणा वाढवण्याचा एक सुंदर प्रयत्न ठरली आहे असे मत स्पर्धेदरम्यान मान्यवरांनी दिलेल्या भेटीतून व्यक्त केले.

महिला दिनाचा सन्मान
८ मार्च, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून समाजातील महिलांचा सन्मान करण्यात आला. महिलांना स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले, ज्यामुळे या स्पर्धेचा सामाजिक दृष्टिकोन अधोरेखित झाला.

अंतिम सामना
अंतिम सामन्यात सेवालाल प्रतिष्ठान संघाने लक्ष्मण बापू यगस्टस संघावर विजय मिळवला. या सामन्यात जिल्ह्यातील सर्व बंजारा समाजातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

पारितोषिक वितरण
प्रथम पारितोषिक सेवालाल प्रतिष्ठान संघाला, द्वितीय पारितोषिक लक्ष्मण बापू यगस्टस संघाला, आणि तृतीय पारितोषिक रामराव महाराज रायडर्स संघाला प्रदान करण्यात आले.

प्रायोजक आणि मान्यवरांचा सहभाग
या स्पर्धेसाठी रमेश चव्हाण (मुख्य प्रायोजक), सुभाष जाधव (सहप्रायोजक), शैलेश पवार, आरती पवार, रवींद्र पवार (ट्रॉफी प्रायोजक), धरमसिंग चव्हाण, आनंद पवार, विशाल चव्हाण, करणसिंग राठोड, आत्माराम जाधव, सुनील चव्हाण,बळीराम शेरे, महेश जाधव, रमेश चव्हाण, पारितोषिक आयोजक अमोल राठोड, कॅप प्रायोजक रघुनाथ राठोड, भारमाल नाईक,भाऊल चव्हाण,अभिजीत चव्हाण, तुकडूदास नाईक,प्रेम जाधव मनोज जाधव,सागर राठोड विनोद जाधव,यांसारख्या अनेक मान्यवरांनी सहकार्य केले.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी-  काशिनाथ चव्हाण, सुनील नाईक,पपेश चव्हाण,अतुल चव्हाण,अनिल नाईक,बादल नाईक यांनी विशेष परिश्रम घेतले.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *