Home » जळगाव » बापरे : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू !

बापरे : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू !

यावल : प्रतिनिधी

तालुक्यातील कोरपावली येथील शेळ्या मेंढ्या चालून उदरनिर्वाह करणाऱ्या एका अठरा वर्षीय तरुणाला सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने त्याचा चिखलात गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना यावल तालुक्यातील कोरपावली गावाबाहेर आठ जून रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली यामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. यात जयेश संतोष महाजन (वय १८, रा. कोरपावली, ता. यावल) असे मयत तरुणाचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे कि, कोरपावली गावाच्या बाहेर असणाऱ्या सांडपाण्याच्या खड्ड्यातील चिखलात आठ जून रोजी सायंकाळी सात वाजता जयेश महाजन हा नेहमीप्रमाणे शेळ्या मेंढ्या चारून येत असताना यातील एक शेळी खड्ड्यात पडल्याने त्याने तिला वाचवण्यासाठी तो देखील खड्ड्यात उतरण्याच्या प्रयत्नात त्याचा तोल जाऊन तो चिखलात रुतल्याने त्याचा गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. घटनेची माहिती कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घऊन त्याला खड्ड्यातून काढून यावल ग्रामीण रुग्णालयात कृ उभा सभापती राकेश हेगडे सरपंच विलास अडकमोल उमेश जावळे यांच्यासह अन्य व्यक्तीने दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जयेशला तपासून मृत घोषित केले. याबाबत यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *