जळगाव : प्रतिनिधी
अल्पवयीन मुलीसोबत मैत्री करून नंतर तिचे फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिला इंदूरसह शिरसोलीच्या जंगलात नेऊन तीच्यावर वर्षभरापासून अत्याचार केला. ही घटना काही दिवसांपुर्वी उघडकीस आली. या प्रकरणी अत्याचार करणाऱ्या नितेश धनराज राठोड याच्यासह त्याला मदत करणारे तीन जण असे एकूण चार जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील एका गावातील १७वर्षीय मुलीसोबत नितेश राठोड (रा. धानवड ता. जळगाव) याने मैत्री केली. त्यानंतर त्या मुलीला वेगवेगळ्या ठिकाणी घेवून गेला. त्य अल्पवयीन मुलीचा एकटीचा तसेच सोबत काढलेले अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत इंदूरमधील प्रितमपूर भागासह शिरसोलीच्या जंगलात नेऊन तिच्या मनाविरुद्ध शरीरसंबंध केले. तसेच तरुणीच्या आई-वडिलांना व तिला मारून टाकण्याची धमकी देत तो हा प्रकार करीत राहिला होता. मदत करणाऱ्यांविरुद्ध देखील गुनहा दाखल या प्रकरणी अल्पवयीन मुलीने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यावरून नितेश राठोड याच्याविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच मुलीला पळवून नेण्यास मदत करणारे गोविंद रामसिंग राठोड, ज्ञानेश्वर भावलाल चव्हाण, गोरख थानसिंग चव्हाण (सर्व रा. धानवड ता. जळगाव) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि माधुरी बोरसे करीत आहेत.



