Home » जळगाव » चाळीसगाव » भडगाव तालुका तरुणाच्या खुनाने हादरला : धक्कादायक कारण आले समोर !

भडगाव तालुका तरुणाच्या खुनाने हादरला : धक्कादायक कारण आले समोर !

भडगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील बाळद खुर्द येथे घराचे वाटणीत जास्त हिस्सा मागतो या कारणावरून धक्काबुक्की करून लाथा बुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली.  हातात लाकडी दांडके घेऊन तरुणाच्या चेहऱ्यावर व छातीवर मारहाण करून त्याच जीवे ठार मारल्याची घटना दि.८ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. घटनास्थळी भडगाव पोलिसांनी तातडीने धाव घेऊन संशयित बाप आणि मयताच्या भावाला अटक याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी- सुनिल लोटन पाटील वय (५४) धंदा शेती व पोलीस पाटील, रा. बाळद खु. ता भडगांव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,बाळु राजेंद्र शिंदे (नाईक) (वय २६)रा. बाळद खु ता. भडगांव जि. जळगांव हा घराचे वाटणीत जास्त हिस्सा मागतो याकारणावरुन बाळु राजेंद्र शिंदे (नाईक) यास धक्काबुक्की करुन लाथाबुक्कयांनी मारहाण करुन शिवीगाळ केली. तसेच हातात लाकडी दांडके घेवून बाळु राजेंद्र शिंदे (नाईक) याच्या चेहऱ्यावर व छातीवर मारहाण करुन त्यास जीवे ठार मारले.

भडगाव पोलीस स्टेशनला बाप व भाऊ १)भारत राजेंद्र शिंदे, वय २२ वर्ष २) राजेंद्र रामचंद्र शिंदे, वय ४८ वर्ष, दोन्ही रा. बाळद खु ता. भडगांव जि.जळगांव. यांच्याविरुद्ध गु.र.न १२३/२०२५ बी.एन.एस.१०३(१), ११५ (२), ३५२,३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश म्हस्के व पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र चव्हाण हे करीत आहे.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *