Home » राष्ट्रीय » मोठी बातमी : आदिल शाहच्या कुटुंबाला उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मोठी मदत !

मोठी बातमी : आदिल शाहच्या कुटुंबाला उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मोठी मदत !

मुंबई : वृत्तसंस्था

जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यावेळी आदिल शाह यांचा पर्यटकांना वाचवताना मृत्यू झाला होता. अतिरेक्यांनी आदिल शाह यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. आता आदिल शाहच्या कुटुंबाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घर बांधून देणार असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांनी आदिल शाह यांच्या कुटुंबीयांना व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला आहे.

शिंदेंनी व्हिडिओ कॉलद्वारे आदिल शाह यांच्या बंधूशी संवाद साधला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी कुटुंबीयांची विचारपूस केली तसेच कुटुंबीयांनी शिंदेंचे आभार मानले. यावेळी आदिल शाह यांच्या भावाने हल्ल्यावेळी नेमके काय घडले याची माहिती एकनाथ शिंदे यांना दिली.

आदिल शाह हा घोडा सवारी करण्यासाठी तिथे गेला असताना दुपारी 2 च्या सुमारास हल्ला झाला. आम्ही त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न करत होतो परंतु कॉल लागत नव्हता, अशी माहिती आदिल शाह यांच्या भावाने शिंदेंना दिली.

पुढे त्यांनी सांगितले की, संध्याकाळपर्यंत आम्ही त्याची वाट बघत बसलो. नंतर 5 वाजता मी इथल्या स्थानिक पोलिस ठाण्यात गेलो व तिथे हरवला असल्याची तक्रार दाखल करून घ्यायला सांगितली. तसेच मी पोलिसांना मला पहलगामला जाण्याची परवानगी मागितली. त्यांनी घरी जाण्यास सांगितले. आम्ही तपास करतो आणि तुम्हाला कळवतो, असे पोलिसांनी सांगितले.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *