Home » राष्ट्रीय » मोठी बातमी : सोनिया गांधींची प्रकुती बिघडली : दिल्लीतील रुग्णालयात दाखल !

मोठी बातमी : सोनिया गांधींची प्रकुती बिघडली : दिल्लीतील रुग्णालयात दाखल !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोटाशी संबंधीत समस्येमुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशात देखील एका खासगी भेटीवर असताना त्यांची अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

हिमाचलमध्ये ७ जूनला त्यांची तपासणी झाली, त्यावेळी सोनिया गांधी यांना रक्तदाबाचा त्रास झाला होता. त्यांना शिमला येथील एका हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी नेले होते. याशिवाय, फेब्रुवारी महिन्यातही त्यांना पोटाच्या त्रासामुळे सर गंगा राम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

ज्‍येष्‍ठ काँग्रेस नेत्‍या सोनिया गांधी या सध्या ७८ वर्षांच्या आहेत. त्‍यांची प्रकृतीत गेल्‍या काही वर्षात चढउतार होत आहेत. त्यांची प्रकृती अनेक वेळा बिघडली असून त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. सोनिया गांधी यांना २०२३ मध्ये श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यामुळे त्यांना गंगाराम हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले होते. हा त्रास संसर्गामुळेमुळे झाला होता. त्यासंबंधी त्यांना योग्य उपचार देण्यात आले होते. याशिवाय त्यांना २०२२ मध्ये कोरोनाची लागण झाली होती, त्यावेळीही त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांची टीम लक्ष ठेवून होती.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *