Home » जळगाव » मोठी बातमी : विनोद देशमुखला शहर पोलिसांनी घेतले ताब्यात !

मोठी बातमी : विनोद देशमुखला शहर पोलिसांनी घेतले ताब्यात !

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील माजी पदाधिकारी विनोद देशमुख हे दरोड्याच्या गुन्ह्यात कारागृहात असून त्यांच्या अडचणीत वाढण्याची मोठी शक्यता वर्तविली जात आहे. मंगळवारी विनोद देशमुखला फसवणुकीच्या दुसऱ्या एका गुन्ह्यात कारागृहातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. आता तो शहर पोलिस ठाण्याच्या ताब्यात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील व्यावसायिक मनोज वाणी यांच्या कार्यालयात दरोडा टाकल्याच्या प्रकरणात २०२रमध्ये दाखल गुन्ह्यात देशमुख यास २४ सप्टेंबर रोजी अटक केली होती. पोलिस कोठडीनंतर त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली. दरम्यान, देशमुख याच्यासह दिनेश शांताराम पाटील, नीलेश शांताराम पाटील, अश्विनी विनोद देशमुख, मिलिंद नारायण सोनवणे यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात २५ मे २०२३ रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात मनोज लीलाधर वाणी हेच फिर्यादी आहेत. शहरातील दोन दुकाने विक्रीचा व्यवहार २८ लाख रुपयांत करण्याचे ठरले होते. यापोटी देशमुख दांपत्यासह इतरांनी मनोज वाणी यांच्याकडून वेळोवेळी १४ लाख ५० हजार घेतले. परंतु, वाणी यांच्या नावावर खरेदी न करता अश्विनी देशमुख यांच्या नावावर खरेदी केली. अशाप्रकारे फसवणूक केल्याचा आरोप वाणी यांनी केला असून, त्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *