Home » जळगाव » तापी पुलाजवळ आढळला २० वर्षीय तरुणाचा मृतदेह !

तापी पुलाजवळ आढळला २० वर्षीय तरुणाचा मृतदेह !

भुसावळ : प्रतिनिधी

विवरा येथील तरुणाचा मृतदेह भुसावळ येथील तापी पुलाजवळ आढळून आला. याबाबत शहर भुसावळ पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद या आधी करण्यात आली होती. आता बुधवारी त्याचा मृतदेह आढळून आला आहे.

एका अल्पवयीन मुलीच्या नातेवाइकांनी धमकावल्यामुळे त्याने आत्महत्या केली असावी किंवा त्याचा घातपात झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. त्यामुळे गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. नातेवाइकांनी तरुणाचा मृतदेह निंभोरा पोलिस ठाण्यात आणला होता. जबाब नोंदल्यावर मृतदेह विवरे येथे नेण्यात आला. हितेश सुनील पाटील (वय २०) असे या तरुणाचे नाव आहे. याबाबत भुसावळ येथे अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून, मयत हितेश पाटील याच्या वडिलांनी दिलेला जबाब भुसावळ शहर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात येणार असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक हरिदास बोचरे यांनी सांगितले. यावेळी बंदोबस्तासाठी निंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक हरिदास बोचरे, सावदा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नीलेश पाटील यांनी आंदोलकांची समजूत घातली.

हितेश हा जळगाव येथील त्रिमूर्ती महाविद्यालयात शिकत होता. शनिवारी त्याच्याशी संपर्क झाला नाही. त्यानंतर दि. १४ रोजी सकाळी त्याची दुचाकी तापी पुलाजवळ आढळून आली. त्यानंतर दि. १७ रोजी त्याचा मृतदेह मिळून आला. या प्रकरणी मयताच्या नातेवाईकांनी निंभोरा येथे पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला. मृतदेहही पोलिस ठाण्यात आणला होता. घातपात झाल्याचा आरोप करत संबधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *