जळगाव महापालिका निवडणूक प्रभारीपदी मंगेश चव्हाण !

जळगाव : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांची जळगाव महानगरपालिका निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती केली आहे. या संदर्भात दिलेल्या नियुक्तीपत्रात आमदार मंगेश चव्हाण हे आपल्या संघटन कौशल्याच्या जोरावर भारतीय जनता पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन अथक परिश्रम करतील, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त […]
कोकाटेंची विकेट, मुंडेंच्या कमबॅकची चर्चा; राऊतांचा फडणवीसांवर घणाघात !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात बुधवारी (१७ डिसेंबर) घडलेल्या दोन मोठ्या घडामोडींमुळे सत्ताधारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे बिनखात्याचे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सदनिका प्रकरणात नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा व १० हजार रुपयांचा दंड कायम ठेवला, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय […]
मुंबई–नागपूर न्यायालयांना बॉम्ब धमकी, राज्यभर खळबळ

मुंबई : वृत्तसंस्था मुंबईतील उच्च न्यायालयासह वांद्रे, किल्ला कोर्ट आणि राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर जिल्हा न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी गुरुवार, १८ डिसेंबर रोजी देण्यात आली. एका ई-मेलद्वारे ही धमकी देण्यात आल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून पोलिस व सुरक्षा यंत्रणांची मोठी धावपळ सुरू झाली आहे. मुंबई पोलिसांच्या सूत्रांनुसार, मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईटवर धमकीचा […]
आईच्या विचारातून शेगाव वारी; सुशीला आईंच्या शब्दाला अरविंद देशमुखांनी दिली कृतीची जोड

जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्राचे संकटमोचक माननीय नामदार श्री. गिरीश भाऊ महाजन यांचे विश्वासू शिलेदार अरविंद देशमुख यांच्या मातोश्री श्रीमती सुशीला भगवान देशमुख यांचा ८५ वा वाढदिवस नुकताच अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात साजरा झाला. या प्रसंगी सुशीला आईंनी अरविंद देशमुख यांना एक मोलाचा विचार दिला. “सामाजिक व राजकीय कार्य करत असताना अध्यात्माकडे कधीही दुर्लक्ष करू […]
महिन्याला १८ हजारांचा‘हफ्ता’ मागणारा दुय्यम निरीक्षक रंगेहाथ पकडला

जळगाव : प्रतिनिधी दारूबंदी कायद्यान्वये कारवाई टाळण्यासाठी आणि दारूचा अवैध धंदा विनाअडथळा सुरू ठेवण्यासाठी १८ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यातील १० हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षकासह त्याच्या खासगी चालकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ अटक केली. या कारवाईमुळे जिल्ह्यातील महसूल व उत्पादन शुल्क विभागात एकच खळबळ उडाली आहे. […]
संत ज्ञानेश्वर विद्यालयात अप्रगत विद्यार्थ्यांसाठी विशेष कृती आराखडा राबविण्यास प्रारंभ

जळगाव : प्रतिनिधी संत ज्ञानेश्वर विद्यालयात शैक्षणिकदृष्ट्या इयत्ता पहिली व दुसरीच्या अप्रगत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विशेष कृती आराखडा राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या आराखड्याचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वाढवून त्यांना मुख्य प्रवाहात आणणे हा आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची पातळीनुसार गटवारी करून वाचन, लेखन व गणित या मूलभूत कौशल्यांवर भर देण्यात येणार आहे. अतिरिक्त […]
महाविकास आघाडीचा फज्जा : ठाकरे–पवार गट थेट भिडणार

जळगाव : प्रतिनिधी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीची पहिलीच बैठक फिस्कटली आणि अखेर शिवसेना (ठाकरे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांचा काडीमोड झाला आहे. दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे सर्व 75 जागांवर उमेदवार उभे करण्याची घोषणा केली असून, या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात थेट आमनेसामने लढत रंगणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचा ठराव प्रभारी नेते जयसिंगराव गायकवाड […]
तापी पुलाजवळ आढळला २० वर्षीय तरुणाचा मृतदेह !

भुसावळ : प्रतिनिधी विवरा येथील तरुणाचा मृतदेह भुसावळ येथील तापी पुलाजवळ आढळून आला. याबाबत शहर भुसावळ पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद या आधी करण्यात आली होती. आता बुधवारी त्याचा मृतदेह आढळून आला आहे. एका अल्पवयीन मुलीच्या नातेवाइकांनी धमकावल्यामुळे त्याने आत्महत्या केली असावी किंवा त्याचा घातपात झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. त्यामुळे गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात […]
लुटमारीच्या प्रयत्नातून गोळीबार; पान टपरी चालक गंभीर जखमी !

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील जळगाव नाका परिसरात बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास झालेल्या गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. व्यापारी संकुलाजवळील पानाच्या टपरीवर लुटमारीचा प्रयत्न करताना झालेल्या गोळीबारात उल्हास गणेश पाटील (वय ३९) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या जळगाव येथे उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, खळवाडी पुलाच्या बाजूला असलेल्या व्यापारी संकुलाजवळील पानाच्या टपरीवर बुधवारी […]
चोरट्यांचा उच्छाद वाढला ; सोने-रोकड नाही तर पीठ-मेथीच्या लाडूंवरही डल्ला !

बोदवड : प्रतिनिधी बोदवड तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून चोरीच्या घटनांनी अक्षरशः डोके वर काढले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे चोरट्यांना आता सोने, चांदी किंवा रोकड मिळाली नाही तर ते घरातील गव्हाचे पीठ आणि हिवाळ्यासाठी बनविलेले मेथीचे लाडूही घेऊन जात असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. मनूर गावात एकाच रात्री सात घरफोड्या झाल्याने […]