भुसावळ : प्रतिनिधी
तालुका पोलिस स्टेशनच्या हद्दीत एका झाडाखाली साकरी शिवारात दीपनगर येथे एका ७० ते ७५ वर्ष वयोगटातील अनोळखी वृद्धाचा मृतदेह आढळून आला आहे. अद्याप त्याची ओळख पटलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेची माहिती निंभोरा बुद्रुक पोलिस पाटील विजय मुरलीधर धांडे यांनी दिली. त्यांना गावातील रहिवासी आशिष सुरवाडे यांनी फोनवर माहिती दिली की, ए.जे. हॉटेल समोर रस्त्यालगत एक वृद्ध इसम मृतावस्थेत आढळला आहे. त्यानंतर संबंधित व्यक्तीला ट्रामा सेंटर, ग्रामीण रुग्णालय भुसावळ येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हे.कॉ. संदीप प्रल्हाद बडगे हे करीत आहे.



