ठाकरेंनी फक्त नमाज पडायचेच बाकी ठेवले ; प्रकाश आंबेडकर !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती व महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता मुस्लिम नेत्यांसह शिवसेना ठाकरे गटानेही वक्फ विधेयकाला मोठा विरोध केला आहे. वक्फ बोर्डाच्या जमिनींसह सर्व देवस्थानांच्या जमिनी मोदी सरकार त्यांच्या उद्योगपती मित्रांना देणार असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. यावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे. उद्धव […]
चोरट्यांची दहशत वाढली : भरदिवसा कुलूप तोडून दागिन्यासह रोकड लांबविली !

जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील एका पत्रकाराच्या घरात भर दिवसा चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सोन्यासह चांदीचे दागिने व रोकड लंपास केल्याची घटना आज दिनांक १० एप्रिल रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील महाबळ रस्त्यावर असलेल्या मायादेवी मंदिराच्या मागील बाजूला […]
आ.धस यांचा गौप्यस्फोट : बीडमध्ये आजही आकाची टोळी !

बीड : वृत्तसंस्था बीड जिल्ह्यातील सरपंच खून प्रकरणी आरोपी जेरबंद होवून कोर्टात सुनावणी सुरु असतांना आता भाजप आमदार सुरेश धस यांनी वाल्मीक कराडची टोळी आजही बीड जिल्ह्यात सक्रिय असल्याचा दावा केला आहे. ‘आका’ची टोळी आजही कार्यरत आहे. एसीपी नवीन आहेत. त्यांना याची माहिती नाही. या लोकांनी यापूर्वी वॉचमनला मारहाण केली. त्यातून हे सर्वकाही घडले, असे […]
अजित पवारांचे संकेत : मात्र तिसऱ्या वेळी चूक केल्यास माफी नाही, तर मंत्रिपद बदलू’ !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकरी कर्जमाफीवरुन वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ज्यानंतर त्यांच्यावर राज्यभरातून टीका करण्यात आली. यावरून वाद निर्माण झाल्यानंतर अखेर कोकाटे यांना आपल्या वक्तव्याप्रकरणी जाहीरपणे माफी मागावी लागली. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार यांनी देखील माणिकराव कोकाटेंना खडेबोल सुनावले आहे. देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक […]
कासोद्याजवळ दुधाच्या टँकरच्या धडकेत प्रौढाचा दुर्देवी मृत्यू !

एरंडोल : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना एरंडोलकडून भरधाव वेगात येणाऱ्या दुधाच्या टँकरने पायी फिरायला गेलेल्या प्रौढास मागाहून जबर धडक दिल्याने पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना ८ एप्रिलला रात्री कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर घडली. मिळालेल्या माहितीनुसार, येथील भावे नगरमधील रहिवासी योगेश चंद्रकांत देशमुख (वय ४८) हे दररोज रात्री जेवणानंतर शतपावलीसाठी रस्त्याच्या कडेने […]
तहसीलदार बनविण्याचे आमिष महिलेची लाखो रुपयात फसवणूक !

जळगाव : प्रतिनिधी मुलीला तहसीलदार बनविण्याचे अमिष दाखवित कल्पना आत्माराम कोळी (वय ५३, रा. नेहरुनगर, मोहाडी रोड) यांच्याकडून ज्योती अशोक साळुंखे (रा. मणियार वाडा, बालाजी मंदिराजवळ) या महिलेने ४ लाख २२ हजार रुपये रोख, ३ लाख रुपयांचे ११० ग्रॅम वजनाची सोन्याचे दागिने आणि विविध शासकीय योजनांचे फॉर्म भरुन जमा झालेले ३ लाख ५१ हजार ९५० […]
वीज तारांच्या धक्क्याने तरुणाचा जागीच मृत्यू

जळगाव : प्रतिनिधी शहरातील चौगुले प्लॉट येथील रेल्वे लाइनजवळ महावितरणच्या विजेच्या तारांच्या धक्क्याने लागल्याने २१ वर्षीय तरुणाचा जागेवरच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी ५ वाजता घडली. यासंदर्भात शनी पेठ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. सविस्तर वृत्त असे कि, योगेश रघुनाथ डोंगर (वय २१, रा. गवळीवाडा) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. गवळी […]
बांधकाम मजुराला मारहाण करीत रोकड लांबविली !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील सुरत रेल्वेगेट भागाजवळील रस्त्यावर एका बांधकाम मजुराला मारहाण करून त्याच्याकडून १७ हजार रुपयांची रोख रक्कम दोन चोरट्यांनी लांबवल्याची घटना मंगळवारी सकाळी १०:३०च्या सुमारास घडली. या प्रकरणी जळगाव शहर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील राजमालती नगरातील रहिवासी रवींद्र बाबुलाल लुले (वय ४७) हे बांधकाम […]
साकरी शिवारात आढळला वृद्धाचा मृतदेह

भुसावळ : प्रतिनिधी तालुका पोलिस स्टेशनच्या हद्दीत एका झाडाखाली साकरी शिवारात दीपनगर येथे एका ७० ते ७५ वर्ष वयोगटातील अनोळखी वृद्धाचा मृतदेह आढळून आला आहे. अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेची माहिती निंभोरा बुद्रुक पोलिस पाटील विजय मुरलीधर धांडे यांनी दिली. त्यांना गावातील रहिवासी आशिष सुरवाडे यांनी फोनवर माहिती दिली की, ए.जे. […]
या राशीतील व्यक्तींनी विरोधकापासून सावधान राहा !

मेष राशी आज तुमचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. संयमाने काम करा. विरोधकांपासून सावध राहा. काम पूर्ण होईपर्यंत कोणाशीही चर्चा करू नका. अतिरिक्त मेहनतीने परिस्थिती सुधारेल. उपजीविकेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या वैयक्तिक समस्या वाढू शकतात. वृषभ राशी आज आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. व्यवसायात सामान्य आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये घाई करू नका. नवीन […]