Home » जळगाव » उधारीच्या पैश्याचा वाद : दारूच्या दुकानात शिवीगाळ एकाला जबर मारहाण !

उधारीच्या पैश्याचा वाद : दारूच्या दुकानात शिवीगाळ एकाला जबर मारहाण !

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील नेरीनाका परिसरातील देशी दारून दुकानाजवळ दारूसाठीचे उरलेले पैसे मागण्याच्या कारणावरून एका फळ विक्रेत्याला शिवीगाळ करून दुकानासमोर ढकलून दिले. यामध्ये प्रौढ फळ विक्रेता जखमी झाल्याची घटना मंगळवार दि. १४ जानेवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता घडली. याप्रकरणी बुधवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील तुकाराम वाडी परिसरात नरेंद्र कडू चौधरी (वय ४१) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. फळविक्री करून ते आपला उदरनिर्वाह करतात. दरम्यान नेरी नाका येथील देशी दारूच्या दुकानात काम करणारा कार्तीक नावाच्या मुलाने नरेंद्र चौधरी यांना मागचे राहिलेले तिनशे रुपये मागितले. त्यावेळी नरेंद्र यांनी फक्त दीडशे रूपये बाकी असल्याचे सांगितले. या रागातून कार्तीक याने नरेंद्र चौधरी यांना शिवीगाळ करत दुकानाजवळ ढकलून दिले. यात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी नरेंद्र चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित कार्तीक पुर्ण नाव माहित नाही याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *