मंत्री मुंडेंचे टेन्शन वाढणार ? कृषी साहित्य खरेदीच्या धोरणात बदल केल्याने अडचणीत !
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यातील बीड जिल्ह्यातील खून प्रकरणात मंत्री मुंडे यांचे निकटवर्तीय असल्याचा आरोप होत असताना आता मंत्री धनंजय मुंडे पुन्हा एका वादात अडकले आहेत. मागील महायुतीच्या काळात ते कृषी मंत्री असताना त्यांनी कृषी साहित्य खरेदीच्या धोरणात बदल केला होता. हा बदल आता वादात सापडला आहे. धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात धोरण कशासाठी […]
वडिलांचा राग अनावरण : डोकं आपटून केला मुलाचा खून !
बारामती : वृत्तसंस्था राज्यातील बारामती तालुक्यातील होळ येथील पीयुष विजय भंडलकर या 9 वर्षीय बालकाचा त्याच्याच वडिलांनी रागाच्या भरात भिंतीवर डोकं आपटून आणि गळा दाबून खून केल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. 14 जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजता राहत्या घरी ही घटना घडल्याची माहिती आहे. त्यानंतर हा सर्व प्रकार दडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र वडगाव […]
क्रीडा विश्वात खळबळ : माजी पंतप्रधान इम्रान खानला १४ वर्षाच्या तुरूंगवासाची शिक्षा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना १९ कोटी पौंड जमीन भ्रष्टाचारप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. त्यांना १४ वर्षाच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तर त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांना देखील या भ्रष्टाचार प्रकरणात दोषी ठरवण्यात आल्याचे वृत्त पाकिस्तानच्या डॉन न्यूजने दिल्याचे एएनआयने म्हटले आहे. पाकिस्तानातील अल-कादिर ट्रस्ट जमीन भ्रष्टाचार प्रकरणात शुक्रवारी […]
पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात : ९ जणांचा जागीच मृत्यू

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असतांना आता पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव जवळ एक भीषण अपघात झाला आहे. यात आयशर आणि एसटीच्या मध्ये आल्यानंतर मॅक्सीमो गाडीचा चक्काचूर झाला आहे. या घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तर मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार नाशिक – पुणे […]
बीड हादरल : दोन सख्ख्या भावांची निर्घृण हत्या, नातेवाईकानी घेतला जीव !

बीड : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून बीड जिल्ह्यात अनेक धक्कादायक घटनेमुळे चर्चेत आला असून आता पुन्हा एकदा अशाच एक घटनेने बीड जिल्हा हादरला आहे. आष्टी तालुक्यातील वाहिरा परिसरात दोन सख्ख्या भावांची निर्घृण हत्या करण्यात आल्याने मोठी खळबळ माजली आहे. पारधी समजातील दोघांची हत्या झाली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या दोन तरूणांच्या नातेवाईकानेच त्यांचा निर्घृणपणे चाकूने […]
यावल महसूल विभागाच्या पथकाने पकडला अवैध वाळु वाहतूकीचे डंपर !

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील वड्री गावाजवळ अवैध वाळू वाहतूक करणारे डम्पर महसूल विभागाच्या पथकाने पाठलाग करून पकडले. हे डम्पर नदीपात्रात अडकल्याने चालकाने तेथेच सोडून दिले. हे डम्पर जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढून तहसील कार्यालयात नेण्यात आले. डम्पर मालकाला दंड ठोठावण्यात आला. डम्पर क्रमांक एमएच १९ सीवाय ८४८१ हे सुशील मोतीलाल पाटील, रा. जळगाव यांच्या मालकीचे आहे. […]
चोपडा पोलिसांनी केला गांजा वाहतूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश !

चोपडा : प्रतिनिधी शहर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा लावत गुरुवारी पहाटे दोन ठिकाणी कारवाई करत गांजा वाहतूक आणि विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. सहाजणांच्या टोळीला अटक करत त्यांच्याकडून एकूण १३ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे ५:३० वाजेच्या सुमारास चोपडा-शिरपूर रोडवरील अकुलखेडा गावाजवळ सापळा लावण्यात आला. अकुलखेडा बसस्थानक […]
उधारीच्या पैश्याचा वाद : दारूच्या दुकानात शिवीगाळ एकाला जबर मारहाण !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील नेरीनाका परिसरातील देशी दारून दुकानाजवळ दारूसाठीचे उरलेले पैसे मागण्याच्या कारणावरून एका फळ विक्रेत्याला शिवीगाळ करून दुकानासमोर ढकलून दिले. यामध्ये प्रौढ फळ विक्रेता जखमी झाल्याची घटना मंगळवार दि. १४ जानेवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता घडली. याप्रकरणी बुधवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील तुकाराम वाडी परिसरात नरेंद्र […]
दोघांकडून ३६ हजाराच्या ४ किलो ५०० ग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई !

चोपडा : प्रतिनिधी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे चोपडा ते शिरपूर रोडवरील अकुलखेडा गावाजवळ दुचाकीवरून येणाऱ्या विजय मोरे व अविनाश पाटील या दोघांकडून ३६ हजाराच्या ४ किलो ५०० ग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत केला आहे. या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर तालुक्यातील भोरखेडा येथील विजय देवराम मोरे (वय २८) […]
कायदेशीर बाबींमध्ये निष्काळजी राहू नका
मेष : आज एखादे महत्त्वाचे काम वेळेवर पूर्ण झाल्याने दिलासा मिळेल. कार्यक्षेत्राशी संबंधित कोणतीही चांगली बातमी मिळू शकते. जास्त काम असूनही घर-कुटुंबाला प्राधान्य दिल्याने घरातील वातावरण गोड राहील. वृषभ : तुम्ही तुमच्या प्रतिभेने आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करू शकाल. मालमत्तेच्या वाटणीवरून होणारे वाद परस्पर संमतीने किंवा हस्तक्षेपाने सोडवले जातील. आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मेहनतीचे सकारात्मक […]