Home » जळगाव » घरात घुसून मेहुण्यासह शालकला जबर मारहाण !

घरात घुसून मेहुण्यासह शालकला जबर मारहाण !

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील हरिविठ्ठल नगरात दि. ८ जुलै रोजी अचानक घरामध्ये घुसून उद्देश मंगेश पाटील (२५, रा. हरिविठ्ठलनगर) व त्यांचा शालक राकेश रामदास सूर्यवंशी यांना दोन जणांनी मारहाण केली, तसेच पाटील यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले.याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचे काम करणारे उद्देश पाटील हे हरिविठ्ठल नगरात परिवारासह राहतात. ८ जुलै रोजी घरामध्ये शालकासह गप्पा करीत असताना अचानक तेथे दोन जण आले व त्यांनी दोघांना शिवीगाळ करीत मारहाण केली. एकाने धारदार शस्त्राने पाटील यांच्या कानावर व पोटावर वार केले. यात त्यांना जबर दुखापत झाली. याप्रकरणी उद्देश पाटील यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ शरद वंजारी करीत आहेत.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *