अमळनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील लोण खुर्द येथे ३६ वर्षीय शेतकऱ्याने कर्जाचा बोझा व नापिकीला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना ९ रोजी घडली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, मयत समाधान विजय पाटील (३६) यांच्याकडे साधारण दोन बिघे शेती होती. घरात दारिद्रय असून अत्यल्प शेतीवर प्रपंच भागत नसल्याने बाहेर कामाला जाण्याशिवाय पर्याय नव्हता. ९ रोजी दुपारी समाधान पाटील हे घरी नसल्याने नातेवाईकांनी शोध घेतला असता लोण खुर्द शिवारातील उमेश पाटील यांच्या शेतातील विहिरीजवळ त्यांची चप्पल आढळून आली. गावातील लोकांनी विहिरीत उतरून त्याचा मृतदेह बाहेर काढले व शवविच्छेदनासाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ सुनील पाटील हे करीत आहेत. नापिकीमुळे कर्जाचा बोझा वाढला होता.
