महानगरपालिकेतील अधिकारी कारवाई करणार का ?
जळगाव : प्रतिनिधी

जळगाव शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महानगरपालिकेने गेल्या तीन महिन्यापूर्वी एका बीव्हीजी कंपनीला कंत्राट दिला आहे. मात्र तरी देखील जळगाव शहर अस्वच्छ दिसत असून दुसरीकडे वजन वाढवण्यासाठी कंपनीमार्फत वाहतूक करणाऱ्या गाडीमध्ये मातीचे वजन वाढवून मनपाला आर्थिक फटका लावत असल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव महानगरपालिका अंतर्गत होणारे अस्वच्छता स्वच्छ करण्यासाठी महानगरपालिकेने गेल्या तीन महिन्यापूर्वी बीव्हीजी या खाजगी कंपनीला कंत्राट दिला असून या कंपनीच्या मार्फत दिवसभर महत्त्वाच्या ठिकाणाहूनच कचरा उचलला जात आहे तर कचरा वजनात भरत नसल्याने या कचऱ्यामध्ये माती मोठ्या प्रमाणात टाकून ती गाडी मोजमाप करून त्याप्रमाणे महानगरपालिकेतून बिल्ले काढली जात असल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे त्यामुळे जळगाव महानगरपालिकेला आता या नव्या कंपनीने आर्थिक चुना लावत आहे की काय अशी देखील चर्चा सध्या जळगाव शहरात रंगू लागली आहे. याबाबत आरोग्य अधिकाऱ्यांनी तत्काळ या विषयाची दखल घेऊन संबंधित खाजगी कंपनीला दंड द्यावा अशी देखील मागणी जोर धरीत आहे.
कुठे घडली घटना…
जळगाव शहरातील कचरा अनेक गाड्यांच्या माध्यमातून आव्हाने शिवारातील कचरा डेपोत टाकला जातो या ठिकाणी हा कचरा टाकत असताना एका नंबरच्या माध्यमातून कचरा व कचऱ्यात असलेले माती मोठ्या मोठ्या प्रमाणात टाकली जात होती त्यावेळेस ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे यावर आता महानगरपालिका काय कारवाई करते याकडे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.



