Home » जळगाव » महाबळ परिसरात कारचालकाचा थरार : पादचारीसह अनेक वाहनांना दिली जबर धडक !

महाबळ परिसरात कारचालकाचा थरार : पादचारीसह अनेक वाहनांना दिली जबर धडक !

जळगाव : प्रतिनिधी

भरधाव कारचालकाने पादचारी व इतर वाहनांना धडक देत पलायन केले. यादरम्यान वंदना सुनील गुजराथी ( ४९, रा. पार्वतीनगर) या महिलेला धडक दिल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ही घटना गुरुवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास महाबळ परिसरात घडली. या प्रकरणी रामानंदनगर पोलिसांनी वाहनचालक मोंटू सैनी (२६, रा. वाघ नगर) यास ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाघ नगरमधील मोंटू शिवपाल सैनी हा कार (क्र. एमएच १९, ईपी १६९४) घेवून भरधाव वेगाने जात होता. महाबळ परिसरातील खासगी क्लासेस जवळ त्याने अनेक वाहनांना धडक दिली. यामध्ये वाहन चालक गंभीर जखमी झाले. त्यानंतर पुढे गेल्यानंतर रस्त्याने जात असलेल्या वंदना गुजराथी यांना धडक दिली. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

अनेकांना धडक देणाऱ्या वाहनचालकाचा परिसरातील नागरिकांनी पाठलाग केला. सैनी हा दर्गा परिसरात वाहन सोडून झाला. करणाऱ्यांनी पसार पाठलाग त्याला कोल्हे हिल्स परिसरात पकडले. पब्लिक मारही देण्यात आला व पोलिसांच्या स्वाधीन केले. रामानंद नगर पोलिसांनी सैनीला ताब्यात घेत त्याचे वाहनदेखील जप्त केले असून त्याच्याविरुद्ध रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *