September 20, 2026 8:17 pm

‘ धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’अंतर्गत आदिवासी समाजाच्या गावात १७ प्रकारच्या योजना राबविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जळगाव : प्रतिनिधी ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’अंतर्गत राज्यातील आदिवासी गावांमध्ये १७ प्रकारच्या योजनांची अंमलबजावणी करून आदिवासी समाजाचा कायापालट केला जाणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. धरणगाव येथे उभारण्यात आलेल्या क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे उद्घाटन व जामनेर तालुक्यातील गोद्री फत्तेपूर येथे गोर बंजारा आणि लबाना कुंभ स्मृतीस्थळी पाच कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे […]

अवैध वेश्याव्यवसायाचा यावल पोलिसांनी केला पर्दाफाश !

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील किनगाव शिवारातील ‘मनमंदिर’ परमिट रूम आणि लॉजिंगच्या नावाखाली सुरू असलेल्या अवैध वेश्याव्यवसायाचा यावल पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी छापा टाकून चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील किनगाव शिवारातील चोपडा ते यावल महामार्गाजवळ असलेल्या मनमंदिर परमिट रूम व लॉजिंगमध्ये बेकायदेशीर […]

चोपडा तालुक्यातील दुर्गम भागातील विनापरवाना कृषि सेवा केंद्रावर छापा !

जळगाव : प्रतिनिधी चोपडा तालुक्यातील मौजे वैजापूर येथील मे. न्यू लक्ष्मी कृषी केंद्र या विनापरवाना सुरू असलेल्या कृषि सेवा केंद्रावर जिल्हा स्तरावरील भरारी पथकाने छापा टाकत सुमारे 7.35 लाख रुपये किंमतीचा अनधिकृत बियाणे आणि रासायनिक खत साठा जप्त केला. न्यू लक्ष्मी कृषी केंद्राचे प्रोप्रायटर श्री. योगीराज देवसिंग पाटील (वय 30, रा. नागलवाडी) हे 25 मे […]

पण हिंदी भाषेचा द्वेष नको ; शरद पवारांनी मांडली भूमिका !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यात हिंदी व मराठी भाषेवरून मोठा वाद सुरु असतांना आता हिंदी भाषेच्या सक्तीवरून राज्यात आकांडतांडव माजले असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यासंबंधीची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हिंदी भाषेची सक्ती असू नये. पण हिंदी भाषेचा द्वेष करणे हे विद्यार्थ्यांच्या हिताचे नाही. या प्रकरणी […]

महाबळ परिसरात कारचालकाचा थरार : पादचारीसह अनेक वाहनांना दिली जबर धडक !

जळगाव : प्रतिनिधी भरधाव कारचालकाने पादचारी व इतर वाहनांना धडक देत पलायन केले. यादरम्यान वंदना सुनील गुजराथी ( ४९, रा. पार्वतीनगर) या महिलेला धडक दिल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ही घटना गुरुवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास महाबळ परिसरात घडली. या प्रकरणी रामानंदनगर पोलिसांनी वाहनचालक मोंटू सैनी (२६, रा. वाघ नगर) यास ताब्यात घेतले आहे. […]

फसवणूक : मेहुण्याला शालकाने लावला तीन कोटींत चुना !

जळगाव : प्रतिनिधी व्यवसायासाठी घेतलेले चार किलो सोने परत देण्याबाबत टाळाटाळ करून सुनील दीनानाथ सराफ (५५, रा. श्री स्वामी समर्थ केंद्राजवळ) यांची तीन कोटी रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आली. हा प्रकार सन २००८ ते २०१४ दरम्यान घडला. या प्रकरणी सराफ यांचे शालक अमित दिलीप सोनार (४५, रा. नंदुरबार) याच्याविरुद्ध शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर […]

खळबळजनक : जळगावातील १६ वर्षीय मुलीने घेतली विहिरीत उडी !

जळगाव : प्रतिनिधी वडिलांनी रागविल्याने प्रज्ञा रवींद्र शिंदे (१६, रा. खेडी हुडको परिसर) या मुलीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (१९ जून) दुपारी १२ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सविस्तर वृत्त असे कि, सेंट्रिंग काम करणारे रवींद्र शिंदे […]

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जळगाव जिल्हा दौरा

जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचा जळगाव जिल्हा दौरा शुक्रवार, दिनांक 20 जून 2025 रोजी असून या दौऱ्यात ते धरणगाव येथे उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन, क्रांतिकारी खाज्याजी नाईक यांच्या स्मृतीस्थळाचे उद्घाटन तसेच जामनेर तालुक्यातील गोद्री येथील हिंदू गोर बंजारा व लबाना कुंभ प्रेरणा स्थळाच्या ऑनलाईन भूमिपूजन कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. […]

तुमच्या कामात सुरू असलेल्या समस्या सुटणार !

आजचे राशिभविष्य दि.२० जून २०२५ मेष राशी कामाच्या ठिकाणी येणारे अडथळे काही प्रमाणात कमी होतील. जवळच्या सहकाऱ्यांशी मतभेद निर्माण होऊ शकतात. काळजीपूर्वक वागा. समन्वय बिघडू देऊ नका. प्रवासादरम्यान तुम्हाला नवीन मित्र मिळतील. शेतीच्या कामातील अडथळे दूर होतील. वृषभ राशी आज तुम्हाला एखाद्या नको असलेल्या प्रवासाला जावं लागण्याची शक्यता आहे. तुमचे वरिष्ठ जे काही सांगतात ते […]

error: Content is protected !!