Home » जळगाव » विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल !

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल !

जळगाव : प्रतिनिधी

वाघनगर भागातील सुंदरमोती नगरात बुधवारी २३ वर्षीय मयूरी गौरव ठोसर या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी विवाहितेच्या माहेरच्या नातेवाइकांनी सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

विवाहितेचे वडील भगवान बुद्धकले यांनी गुरुवारी रात्री उशिरा जळगाव तालुका पोलिस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली, या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भगवान बुद्धकले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मयत मयूरीच्या सासरच्या मंडळींनी मेडिकल टाकण्यासाठी १० लाख रुपयांची मागणी केली. त्यापैकी ८ लाख दिले होते, उर्वरित २ लाख रुपयांची पुन्हा मागणी केली, ही रक्कम न दिल्याने सासरच्या मंडळींनी मयुरीला वेळोवेळी शारीरिक व मानसिक त्रास दिला. हा मानसिक त्रास सहन न झाल्याने, मयूरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणी मयत मयूरीचा पती गौरव ठोसर, दीर गणेश ठोसर, सासरे किशोर ठोसर व सासू लता ठोसर या चार जणांविरुद्ध मयूरीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अनंत अहिरे हे करत आहेत

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *