धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील पाळधी येथे वाहनांमध्ये अवैध गॅस भरल्याप्रकरणी पोलिसांनी पाळधी येथे दोनजणांवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली. स्थानिक गुन्हे शाखा आणि पाळधी येथील पोलिसांच्या पथकाने बांभोरी येथे टाकलेल्या छाप्यात अनिल शंकर सोनवणे (रा. बांभोरी) हा अवैध गॅस भरताना आढळून आला. त्याच्याकडून जवळपास १० भरलेले सिलिंडर जप्त करण्यात आले. त्यासोबतच वजन काटा, गॅस भरण्याचे मशीन आणि एम.एस. १९ सी.एक्स. १०७५ असा मुद्देमाल आढळून आला.
सविस्तर वृत्त असे कि, दुसऱ्या कारवाईत महामार्गावर असलेल्या मोईन शेख युसुफ शेख (रा. तांबापुरा) याच्याकडे भारत गॅस कंपनीचे २ भरलेले सिलिंडर, त्याच कंपनीचे ६ खाली सिलिंडर, वजन काटा, गॅस भरण्याचे मशीन असा माल मिळून आला. या दोन्ही छाप्यांत एकूण ५ लाख १६ हजार रुपयांचा माल ताब्यात घेण्यात आला. या दोघांवर पाळधी पोलिस चौकी येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सोपान गोरे, सलीम तडवी, छगन तायडे, मयूर निकम, सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत कंडारे, ए. एस. आय. सुनील लोहार, रमेश सूर्यवंशी, अमोल धोबी यांच्या पथकाने केली आहे.
