Home » जळगाव » मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकारांच्या समस्यांबाबत संवेदनशील – प्रवीण सपकाळे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकारांच्या समस्यांबाबत संवेदनशील – प्रवीण सपकाळे

जळगाव : प्रतिनिधी

राज्यातील पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि डिजिटल माध्यमांना शासकीय मान्यता मिळवून देणारे ऐतिहासिक धोरण जाहीर करणारे राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस हे पत्रकारितेविषयी अत्यंत संवेदनशील असल्याचे मत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे यांनी व्यक्त केले.

आज जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा शाल, गुलाब पुष्प व विशेष आभारपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सचिन गोसावी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

डिजिटल माध्यमांसाठी ऐतिहासिक निर्णय

प्रवीण सपकाळे म्हणाले, “मुख्यमंत्री फडणवीस यांनी डिजिटल माध्यम शासकीय जाहिरात धोरण मंजूर करून डिजिटल पत्रकारितेच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला आहे. त्यांच्या निर्णयामुळे राज्यातील हजारो डिजिटल पत्रकारांना न्याय मिळाला असून, या माध्यमांना शासकीय मान्यता व आर्थिक बळकटी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.”

त्या अनुषंगाने संघाने तयार केलेल्या विशेष आभार पत्रात म्हटले आहे की –

“आपण ‘डिजिटल माध्यम शासकीय जाहिरात धोरण’ जाहीर करून ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई संघटने तर्फे आपल्या प्रति आभार व्यक्त करतो. दिनांक २० सप्टेंबर २०२३ रोजी शासन निर्णय क्रमांक-२०२३/प्र.क्र.३२१/प्रसार-५ द्वारे, महाराष्ट्र शासनाने डिजिटल माध्यमांसाठी शासकीय जाहिरात मार्गदर्शक नियम प्रकाशित केले. या निर्णयामुळे नव्या पिढीच्या डिजिटल माध्यमांतील पत्रकारांना हक्काचे स्थान मिळाले असून पत्रकारिता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आणि सामाजिक भान यांना नवे आयाम प्राप्त झाले आहेत.”

आभार पत्रात पुढे नमूद केले आहे की, “या निर्णयामुळे प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमात समतोल साधला गेला आहे. महाराष्ट्रातील हजारो डिजिटल माध्यमांना शासकीय धोरणात स्थान मिळाल्याने संपूर्ण पत्रकार क्षेत्रात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे.”

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *