Home » ताज्या » शहर पोलिसांचा छापा : प्राण्यांचे मांस विक्री करणाऱ्यांवर कारवाई !

शहर पोलिसांचा छापा : प्राण्यांचे मांस विक्री करणाऱ्यांवर कारवाई !

जळगाव : प्रतिनिधी

बेकायदेशीरित्या प्राण्यांचे मांस कापून त्याची विक्री करणाऱ्यांवर शहर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली. याठिकाणाहून गुरांचे मांस याच्यासह ते कापण्याचे साहित्य तराजू आणि रोकड असा एकूण १५ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई दि. २९ रोजी दुपारी उमर कॉलनीत केली. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील उमर कॉलनीत अनुसुचित प्राण्यांची कत्तल करुन त्या प्राण्यांचे मांस विक्री केली जात होते.

याबाबतची माहिती शहर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी दि. २९ रोजी दुपारच्या सुमारास छापा टाकला. याठिकाणाहून ५ किलो प्राण्यांचे मांस, लोखंडी तराजू काटा, लोखंडी सुरा व १३ हजार १७० रुपयांची रोख रक्कम असा एकूण १५ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी हर्षल पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित शाहरुख खान युनूस खान (वय २९, रा. ईस्लामपुरा, भवानी पेठ), तनवीर खान यूनुस खान (वय १८, भिलपुरा) व शाहरुख शेख जुनेद शेख (वय ३२, रा. उमर कॉलनी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *