Home » Uncategorized » सततची नापिकी : ४० वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

सततची नापिकी : ४० वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

पारोळा : प्रतिनिधी

शहरातील देवी पद्मावती नगर मध्ये राहत असलेल्या ४२ वर्षीय शेतकऱ्याची आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना घडली. पारोळा शहरातील देवी पद्मावती नगर मध्ये राहत असलेले दशरथ हिलाल महाडिक (वय ४२) रा. देवी पद्मावती नगर, चोरवड रोड, पारोळा हे दुसऱ्याची शेती जुप पद्धतीने करून आपला उदरनिर्वाह भागवत होते.

सततची नापिकी व दुष्काळग्रस्त स्थितीमुळे ते नेहमी नैराश्यात राहत होते. काही दिवसापासून त्यांच्यावर फायनान्स कंपनीचे कर्ज होते ते कर्ज कसे फिटेल या चिंतेत ते होते. दि.५ रोजी सायंकाळी ६ वाजता शेतातून घरी आल्यानंतर त्यांनी कोणालाही काही न सांगता घराचा मधल्या दरवाजा बंद करून पंख्याला साडीच्या साह्याने गळफास घेवून आत्महत्या केली. याबाबत दि. ६ रोजी पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *