संत ज्ञानेश्वर विद्यालयमध्ये इको क्लबतर्फे शाश्वत शेती दिन’ साजरा

जळगाव : प्रतिनिधी श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक माध्यमिक विद्यालय मध्ये हरितक्रांतीचे जनक आणि भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या जन्मशताब्दी निमित्त, राज्य शासनाने ७ ऑगस्ट हा दिवस दरवर्षी ‘शाश्वत शेती दिन’ म्हणून साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन कृषी अधिकारी जामनेर राजेश नाईक यांनी केली […]
…तरी ओबीसी समाजाच्या हक्कासाठी लढतच राहणार ; मुख्यमंत्री फडणवीस !

गोवा : वृत्तसंस्था माझ्यावर ओबीसी समाजाबद्दल बोललो म्हणून टीका केली जाते, मला टार्गेट केले जात आहे. पण मी कुठल्याही एका समाजाबद्दल बोलत नाही. मला कितीही टार्गेट केले तरी ओबीसी समाजाच्या हक्कासाठी मी लढतच राहणार आहे, मी ती लढाई कधी थांबवणार नाही, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.७) स्पष्ट केले. जोपर्यंत ओबीसी समाज प्रगतीच्या […]
अखेर वनताराने मागितली कोल्हापूरवासियांची माफी ; ‘माधुरी’ हत्तीणीचे आता पुढे काय ?

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी गावातील जैन मठातील ‘माधुरी’ हत्तीणीच्या स्थलांतराच्या वादावर वन्यजीव संघटना ‘वनतारा’ने बुधवारी एक निवेदन जारी केले. त्यात म्हटले आहे की, ‘माधुरी’ हत्तीणीला वनतारा येथे हलवण्याचा निर्णय त्यांचा नव्हता, तर तो माननीय सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार झाला. वनतारा म्हणाले की, न्यायालयाच्या निर्देशांनुसार, त्यांची भूमिका […]
गॅलरीत कपडे काढताना विद्युत शॉकने घेतला जीव; ७१ वर्षीय वृद्धेचा दुर्दैवी मृत्यू, महाबळ परिसर हादरला!

जळगाव : प्रतिनिधी शहरातील महाबळ परिसरातील रोटरीभवन येथील अपार्टमेंटमध्ये उतरलेल्या विद्युत प्रवाहामुळे वाळत टाकलेले कपडे काढत असतांना विजेचा शॉक लागून भावना राकेश जाधव (वय ७१) यांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास महाबळ परिसरातील गजानन रेसीडेन्सी येथे घडली. यावेळी जिल्हा रुग्णालयात त्यांच्या कुटुंबियांसह नातेवाईकांनी गर्दी केली होती. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात […]
सततची नापिकी : ४० वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

पारोळा : प्रतिनिधी शहरातील देवी पद्मावती नगर मध्ये राहत असलेल्या ४२ वर्षीय शेतकऱ्याची आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना घडली. पारोळा शहरातील देवी पद्मावती नगर मध्ये राहत असलेले दशरथ हिलाल महाडिक (वय ४२) रा. देवी पद्मावती नगर, चोरवड रोड, पारोळा हे दुसऱ्याची शेती जुप पद्धतीने करून आपला उदरनिर्वाह भागवत होते. सततची नापिकी […]
…पण माझे प्रेम खरं होतं म्हणत तरुणाने संपविले आयुष्य !

अमळनेर : प्रतिनिधी प्रेयसीने लग्नास नकार दिल्यामुळे तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना डुबक्या शहरातील मारोती रस्त्यालगत बुधवारी दुपारी १२ वाजता घडली. मृताचे नाव गौरव बोरसे (२१, गांधली) असे आहे. मृत तरुणाने आत्महत्येपूर्वी इन्स्टाग्रामवर भावनिक व्हिडीओ पोस्ट करत आपले मनोगत व्यक्त केले होते. आई, मी तुझी इच्छा पूर्ण करू शकलो नाही, माझे वडील माझ्यावर खर्च […]
भरधाव वाहनाच्या धडकेत सांबराचा दुर्देवी मृत्यू

चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील चाळीसगाव ते मालेगाव रस्त्यावरील बेलगंगा येथे बुधवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने सांबराला उडवल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या सांबराला धडक देऊन संबंधित वाहनचालक पसार झाला आहे. याबाबतची खबर कळताच परिसरातील सर्पमित्र कुणाल तांबे, सूरज राजपूत, धीरज पाटील यांनी तत्काळ या ठिकाणी डाव घेत या सांबरला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, […]
धक्कादायक : ‘त्या’ हॉटेलचालकावर गोळीबार प्रकरण : सरपंचानेच दिली सुपारी, राजकीय वैरातून गोळीबार !

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील डोणगाव शिवारात प्रमोद श्रीराम बाविस्कर (रा. चंदू आण्णा नगर) यांच्यावर करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणामध्ये स्थानिक गुन्हे शाखेने पाच जणांना अटक केली आहे. राजकीय वैमनस्यातून पुनगाव येथील सरपंचाने सुपारी देऊन हा गोळीबार केल्याचा तपासात समोर आले. या संदर्भात बुधवारी (६ ऑगस्ट) जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी या गुन्ह्यासह अन्य गुन्ह्यांच्या […]
उत्तरकाशीत ढगफुटी : जिल्ह्यातील २२ भाविक अडकले !

जळगाव : प्रतिनिधी उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली गावात ढगफुटी झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीत जळगावच्या अयोध्यानगरात वास्तव्यास असलेल्या गायिकेसह एकाच कुटुंबातील तीन सदस्य आणि अन्य असे २२ भाविक अडकून पडले आहेत. उत्तरकाशी प्रशासनाशी संपर्क केल्यानंतर ही माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली. जळगावच्या अन्य १९ भाविकांमध्ये पाळधीचे (ता. धरणगाव) १३, धरणगावचे ५ आणि पाचोऱ्यातील एक जवानाचा समावेश […]
खाजगी व्यवसायाशी संबंधित लोकांना व्यवसायात चढ-उतारांचा सामना करावा लागणार !

आजचे राशिभविष्य दि.७ ऑगस्ट २०२५ मेष राशी आज तुम्हाला अशा कामात यश मिळेल ज्याची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होता. कामाच्या क्षेत्रात येणाऱ्या समस्या शांततेने सोडवाव्या लागतील. खाजगी व्यवसायाशी संबंधित लोकांना व्यवसायात चढ-उतारांचा सामना करावा लागेल. कार्यक्षेत्राबाबत नवीन कार्य योजना इत्यादी बनवल्या जातील आणि भविष्यात त्यातून चांगले फायदे मिळण्याची शक्यता आहे. वृषभ राशी आज तुम्हाला […]