Home » जळगाव » पेट्रोलींग दरम्यान सराईत गुन्हेगार अटकेत !

पेट्रोलींग दरम्यान सराईत गुन्हेगार अटकेत !

जळगाव : प्रतिनिधी

हद्दपार असतांना कुठलीही परवानी न घेता घरी वास्तव्य करणारे सराईत गुन्हेगार तेजस दिलीप सोनवणे व सागर उर्फ बिडी सुरेश सपकाळे या दोघांच्या शनिपेठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे सराईत गुन्हेगार तेजस सोनवणे व सागर उर्फ बिडी सपकाळे यांना हद्दपार करण्यात आले आहे. शनिपेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर या हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना त्यांना हद्दपार आरोपी हे विनापरवानगी घरी वास्तव्य करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी गुन्हे शोध पथकातील गणेशकुमार नायकर, दीपक गजरे, शशिकांत पाटील, गणेश ढाकणे, नवजीत चौधरी, काजोल सोनवणे यांच्या पथकाने दोघ संशयितांच्या घरी छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले. त्या दोघांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *