September 29, 2026 4:29 am

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

भुसावळमध्ये पोलिसांची मोठी कारवाई: मध्यरात्री अमली पदार्थांसह तस्कर अटकेत, लाखोंचा गांजा व वाहन जप्त

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अमली पदार्थांच्या तस्करीचा व त्याच्या वापराचा गांभीर्याने घेत, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष निर्देश दिले होते. या आदेशानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी […]

वर्दीला लागला लाचखोरीचा डाग : २ हजारांची लाच घेताना दोन पोलीस अटकेत !

भुसावळ : प्रतिनिधी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यातील दोन सहा फौजदार आणि एका खाजगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव यांनी रंगेहात पकडले. तक्रारदाराविरुद्ध खामगाव न्यायालय, जिल्हा बुलढाणा येथे धनादेश अनादरणा प्रकरणी कलम 138 अंतर्गत गुन्हा दाखल होता. या प्रकरणात न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले होते. सदर वॉरंट अंमलात आणू नये व मुदतवाढ मिळावी यासाठी सहा फौजदार […]

शेतकऱ्यांच्या कर्जमाफी अन अजित पवारांनी दिले सडेतोड उत्तर !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात येत्या काही दिवसांवर गणेशोत्सव येवून ठेपलेला आहे. यामुळे राज्यभरात मोठी धामधूम पाहायला मिळत आहे. पावासाळी अधिवेशनात महाराष्ट्र राज्य महोत्सव म्हणून गणेश उत्सव साजरा करण्यात येणार असल्याची मोठी घोषणा करण्यात आली. याशिवाय पावसाळी अधिवेशनात अनेक मोठी निर्णयही घेण्यात आले. मात्र, बळीराज्याच्या डोक्यावरील कर्ज कधी दूर होणार याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. सध्या […]

“भ्रष्टाचारी तुरुंगात तर जाईलच पण खुर्चीही गमवावी लागेल ; पंतप्रधान मोदी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था बिहारमधील गया याठिकाणी अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी पंतप्रधान मोदी यांनी आज केली. त्यानंतर पंतप्रधानांनी एका जाहीर सभेला संबोधित करत विरोधकांवर, विशेषतः राजद आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकारच्या नवीन प्रस्तावित कायद्याचाही उल्लेख केला, ज्या अंतर्गत, जर पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा मंत्री गंभीर गुन्हेगारी आरोपांवर ३० दिवसांपेक्षा जास्त […]

पालघरमधील फार्मा कंपनीत भीषण दुर्घटना : नायट्रोजन गॅस गळतीने ४ जणांचा मृत्यू!

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील पालघर जिल्ह्यातील मेडले फॉर्मास्युटिकल्स लिमिटेड कंपनीत गुरुवारी संध्याकाळी उशिरा नायट्रोजन वायूची गळती झाली. या अपघातात गुदमरून चार कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना जवळच्या शिंदे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बोईसर तारापूर एमआयडीसी परिसरात असलेल्या कंपनीच्या प्लँट क्रमांक एफ-13 मध्ये औषध निर्मिती प्रक्रिये दरम्यान नायट्रोजन वायूची […]

पेट्रोलींग दरम्यान सराईत गुन्हेगार अटकेत !

जळगाव : प्रतिनिधी हद्दपार असतांना कुठलीही परवानी न घेता घरी वास्तव्य करणारे सराईत गुन्हेगार तेजस दिलीप सोनवणे व सागर उर्फ बिडी सुरेश सपकाळे या दोघांच्या शनिपेठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे सराईत गुन्हेगार तेजस सोनवणे व सागर उर्फ बिडी […]

विहिरीत पडल्याने महिलेच्या दुर्देवी मृत्यू !

भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील वरणगाव शिवारातील गट नंबर ७८३ मधील शेतातील विहिरीत पडल्याने येथील भंगाळे वाडा येथील रहिवासी योगीता धीरज भंगाळे (वय ३५) यांचा गुरुवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. ही विहीर शेतकरी संजय तुळशीराम झांबरे यांच्या मालकीची असून अपघात कसा घडला, याबाबत पोलीस तपास करत आहेत. ही मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना […]

२१ महिला कर्मचारीचे ‘लाडक्या बहिण’ योजनेत समावेश !

जळगाव : प्रतिनिधी राज्यातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर आता कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. महिला व बालविकास विभागाने अशा १,१८३ कर्मचाऱ्यांची यादी ग्रामविकास विभागाकडे पाठवली आहे. ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसाठी यासंदर्भात परिपत्रक काढले असून या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जळगावमधील ७, नंदुरबारमधील गील ८ […]

आजचा दिवस या राशीतील लोकांना फायदेशीर ठरणार !

आजचे राशिभविष्य दि.२२  ऑगस्ट २०२५ मेष राशी आज तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी सकारात्मक वातावरणात काम करायला मिळेल आणि सहकाऱ्यांशी तुमचे संबंध चांगले राहतील. आज तुम्ही एक नवीन काम सुरू कराल, ज्यामध्ये तुम्हाला चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. आज तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. वृषभ राशी आजचा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आज तुम्हाला तुमच्या कौटुंबिक जीवनात […]

error: Content is protected !!