जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील वराड खुर्द येथे शेतीच्या कारणावरून वाद होऊन जगन लालसिंग राठोड (५०, रा. सुभाषवाडी) व त्यांचे शालक संदीप मांगू चव्हाण यांना दोन जणांनी मारहाण केली. ही घटना १२ जून रोजी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, जगन राठोड, त्यांची पत्नी, शालक, सासू-सासरे हे वराड खुर्द येथे शेतात गेले. त्यावेळी शेतात येण्यावरून दोघांनी वाद घातला व शिवीगाळ केली. यात जगन राठोड व संदीप चव्हाण यांना मारहाण करण्यात आली. या घटनेत एकाने चव्हाण यांच्या डोक्यात कुऱ्हाड मारली. या प्रकरणी राठोड यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पो.हे.कॉ. समाधान टहाळके करीत आहेत, अशी माहिती मिळाली.



